गोरखपूर : गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन गॅस सिलेंडरच्या अभावी झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूमुळे देशभर हळहळ व्यक्त होत आहे. या कठीण प्रसंगावेळी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर मागवताना दिसणारा डॉ कफील खान हिरो झाला होता. पण आता याच डॉक्टर कफील खानबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडियामध्ये आलेल्या काही बातम्यांमध्ये कफील खानला हिरो बनवण्यात आलं. पण कफीलबद्दलचं सत्य वेगळंच आहे. डॉ. कफील बीआरडी मेडिकल कॉलेजचा इन्सेफेलाइटिस डिपार्टमेंटचे चीफ नोडल ऑफिसर आहे. पण मेडिकल कॉलेजमध्ये असण्याऐवजी तो स्वत:च्या प्रायव्हेट प्रॅक्टीससाठी जात होता.


कफील हॉस्पिटलमधले सिलेंडर चोरायचे?


डॉ कफील हॉस्पिटलमधले ऑक्सिजन सिलेंडर चोरून स्वत:च्या क्लिनीकसाठी वापरत असल्याचाही आरोप होत आहे. डॉक्टर कफील आणि कॉलेजचे प्रिसिंपल राजीव मिश्रा यांच्यामध्ये साटंलोटं असल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाल्याचंही बोललं जातंय. मुलांच्या मृत्यूनंतर गोंधळ झाला आणि त्यानंतर कफील त्याच्या हॉस्पिटलमधले सिलेंडर घेऊन बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन आला. हे सिलेंडर आपण स्वत:च्या खर्चातून आणल्याचंही कफीलनं सांगतिलं.


मुख्यमंत्र्यांनाही ठेवलं अंधारात


डॉक्टर कफील मेडिकल कॉलेजच्या खरेदी कमिटीचाही सदस्य आहे. ऑक्सिजन पुरवठ्याच्या स्थितीबद्दल कफीलला पूर्ण माहिती होती. ९ ऑगस्टला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मेडिकल कॉलेजचा दौरा केला होता तेव्हा डॉक्टर कफीलही मुख्यमंत्र्यांच्या आसपास होता. पण तेव्हाही त्यानं आदित्यनाथ यांना ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दलची माहिती दिली नाही.


हॉस्पिटलच्या खरेदीवर मिळायचं कमिशन?


बीआरडी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या सगळ्या खरेदीवर काफिलला कमीशन मिळत असल्याचा आरोपही होत आहे. ऑक्सिजन कंपनी पुष्पा सेल्सबरोबर सुरू असलेल्या वादालाही राजीव मिश्रा त्यांची पत्नी पूर्णीमा शुक्ला आणि डॉ कफील अहमद जबाबदार असल्याची माहिती हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.