दार्जिलिंग : पश्चिम बंगालमधून गोरखालँड हे वेगळे राज्य करण्यात यावे, अशी मागणी करत आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, या आंदोलनानं अचानक पेटले आहे. त्यामुळे येथे तणावपूर्ण परिस्थिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोरखा जनमुक्ती मोर्चानं बेमुदत दार्जिलिंग बंदची हाक दिल्यानंतर कालपासून काही भागामध्ये हिंसाचार उफाळलाय. आज या संपाच्या तिसऱ्या दिवशीही काही भागात हिंसाचार झाला. या आंदोलनाचा प्रसिद्ध हिलस्टेशनला मोठा फटका बसलाय. 


जीजेएमचे सर्वेसर्वा बिमल गुरुंग यांनी आरपारची लढाई लढण्यासाठी तयार राहण्याचं आवाहन आपल्या समर्थकांना केलंय. काल पोलिसांनी गुरूंग यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकल्यानंतर ते भूमिगत झालेत. 


दरम्यान, या आंदोलनामुळे अगदी गेल्या आठवड्यापर्यंत पर्यटकांनी फुलेलं दार्जिलिंग ओस पडलंय. पर्यटन हाच इथला मुख्य व्यवसाय असल्यामुळे नागरिकांच्या जीवनमानावरही त्याचा परिणाम झालाय.