मेरठ : बिहार आणि ओडिसाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत प्रतिक्रिया देताना वादग्रस्त विधान केले आहे. मेरठ येथे सोमवारी बोलताना मलिक यांनी म्हटले की, उत्तर भारतातील पुरष हे जनावर झाले आहेत. त्यामुळेच तर पॉस्को अॅक्टमध्ये बदल करण्याची गरज भासली. त्यांनी सांगितले की, या कायद्यात दिन दिवसांपूर्वी झालेल्या बदलाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत, त्यांनी २ आणि १० एप्रिलला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून झालेल्या हिंसा ही चुकीची असल्याचेही त्यांनी सांगितले.


अज्ञानी लोक हिंसा भडकवतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेरठ येथील सभारती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राज्यपाल मलिक सोमवारी बोलत होते. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले, २ आणि १० एप्रिलला देशात झालेली हिंसा ही चुकीची आहे. यात सरकारची कोणतीही भूमिका नाही. अशी कृती करणारे खालच्या स्तरावर नेतृत्व करणारे लोक अज्ञानी आणि इतिहासाची माहिती नसलेले लोक आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, असे कृत्य तेच लोक करत आहेत. ज्यांना वास्तवाची आणि इतिहासाची योग्य माहिती नाही.


टॉयलेट नसणाऱ्या कॉलेजेसची मान्यता रद्द होणार


दरम्यान, देश कोणत्याही उंची इमारती, कारखाने यांनी महान बनत नाही. तर, देशातील युवकांचे चरित्र कसे घडते त्यावर बनतो. पण, दुर्दैव असे की, देशातील अनेक कॉलेजमध्ये टॉयलेटच उपलब्ध नाहीत. त्यामुळे यापुढे ज्या कॉलेजमध्ये टॉयलेट नसेल त्या कॉलेजची मान्यता रद्द केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.