नवी दिल्ली : भाजप खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केलेत. त्याचवेळी शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोपही केलाय. त्यामुळे भाजप त्यांच्या आरोपांना उत्तर देणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लुटारु मद्य सम्राट विजय माल्या देशातून पळून जातो, मात्र शेतकरी मात्र अडकतोय. हे सरकारचे सोंग आहे. हे सरकारचे महापाप आहे, असा जोरदार हल्लाबोल नाना पटोले यांनी केलाय.


गडचिरोलीमधील लाॅईड कंपनीला सुरक्षा का दिली ?, असा सवाल उपस्थित केला. २३ किमी पोलिसांचा बंदोबस्त आहे, त्यासाठी लाॅईड कंपनीकडून पैसे घेतले जात नाही. त्याचवेळी राजकीय नेत्यांचे कंपनीशी लागेबंध आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला. या लागेबांधामुळे कंपनीला पोलिसांडून संरक्षण दिले जात आहे. दरम्यान, सुकमा घटनेनंतर सरकारने सुधारणा केलेली नाही, असे ते म्हणालेत.


दरम्यान, भाजप खासदार नाना पटोले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी एकमेकांना मिठी मारली. दोन्ही नेत्यांनी मागील काही दिवसांपासून मोदी आणि राज्य सरकार विरोधात टीका सुरू केलेय. 


महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, अशी टीका त्यांनी केली. केंद्र सरकारच्या माध्यमातून २ लाख ११ हजारे एनपीए झाले आहेत. मात्र, लुटारू विजय माल्या पळून जातो आणि शेतकरी मात्र कर्जाच्या जाळ्यात अडकतोय. हे सरकारचे सोंग आहे. हे सरकारचे महापाप आहे, असे ते म्हणालेत.