मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किमतींमुळे लोक CNG वाहनांकडे वळत आहे. त्यातच आता केंद्र सरकारने भारत सरकारने BS-6 वाहनांमध्ये सीएनजी (CNG) आणि एलपीजी (LPG) किट बसवण्यास मान्यता दिली आहे. त्याशिवाय 3.5 टनहून कमी वजनाच्या डिझेल इंजिनांना CNG/LPG इंजिनने बदलण्याची परवानगीही देण्यात आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या तुलनेत CNG हे अधिक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक इंधन आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याची किंमत झपाट्याने वाढली आहे. सीएनजीच्या किमतींवर प्रचलित आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम झाला आहे. सध्या, मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजीची किरकोळ विक्री 80 रुपये प्रति किलो आहे आणि दिल्लीत 75.61 रुपये प्रति किलो आहे. 


दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने (Union Ministry of Road Transport) याबाबत एक प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवला आहे. आतापर्यंत BS-6 उत्सर्जन नियमांनुसार मोटार वाहनांमध्ये सीएनजी आणि एलपीजी किटचे रेट्रोल फिटमेंट करण्याची परवानगी नव्हती. मात्र आता सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांमध्ये आता सीएनजी आणि एलपीजी कीट बसवण्यासाठी परवानगी दिली आहे. BS-6 उत्सर्जनाच्या नियमांनुसार, सरकारने ही परवानगी दिली आहे. आत्तापर्यंत BS-4 उत्सर्जन नियमांच्या गाड्यांमध्येच ही तरतूद होती.


रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, BS-6 पेट्रोल गाड्यांमध्ये सीएनजी आणि एलपीजी कीट बसवणे आणि BS-6 वाहनांमध्ये साडेतीन टनापेक्षा कमी वजन असलेल्या डीझेल इंजिनांऐवजी सीएनजी, एलपीजी इंजिन बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सीएनजी एक पर्यावरणासाठी अनुकूल असलेलं इंधन आहे. पेट्रोल आणि डिझेल इंजिनाच्या तुलनेत कार्बन मोनोक्साईड, हायड्रोकार्बन आणि धुराच्या उत्सर्जनाचं प्रमाण कमी करेल.