नवी दिल्ली : एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला केंद्र सरकारनं तत्त्वतः मंजुरी दिली आहे. कर्ज आणि तोट्याच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियामधील आपले समभाग विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयला मंजुरी देण्यात आली आहे. निर्गुंतवणूक प्रक्रिया निश्चित करण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे एअर इंडियाचं खासगीकरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.


एअर इंडियावर सध्या 52 हजार कोटींचं कर्ज आहे. एकूण कर्जापैकी 30 हजार कोटी रुपयांचे कर्ज राइट ऑफ करण्याची शिफारस नीती आयोगानं केंद्र सरकारकडे केलीय. टाटा समूहानं एअर इंडियामधला हिस्सा घेण्याची यापूर्वीच तयारी दाखवली आहे.