मुंबई : तुम्ही कामानिमित्तानं किंवा फिरायला जाताना विमान कंपन्यांचं तिकीट बूक केलं असेल... पण, ऐनवेळी काही महत्त्वाच्या कारणास्तव तुम्हाला ते तिकीट रद्द करावं लागलं असेल तर ३००० रुपयांचा भूर्दंडही तुम्हाला भरावा लागला असेल... परंतु, लवकरच हा भूर्दंडापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, घरगुती उड्डाणांची तिकिटं रद्द केल्यानंतर अनेक विमान कंपन्या ३००० रुपयांचा दंड प्रवाशांकडून वसूल करतात, हा दंड खूपच जास्त आहे... त्यामुळे विमान कंपन्यांनी हा निर्णय मागे घ्यावा. सरकार लवकरच या मुद्द्यावर विमान कंपन्यांशी चर्चा करणार आहे. उड्डानमंत्री जयंत सिन्हा यांनी एका वर्तमानपत्राशी बोलताना ही माहिती दिलीय. 


सध्या, विमान कंपन्यांनी तिकीट रद्द करण्याच्या चार्जेसशिवाय आणखीही काही सुविधांचे चार्जेस वाढवल्याचं दिसतंय. १५ किलो वजनाच्या सामानापेक्षा अधिक सामान असेल तर त्यावर अधिक दंड वसूल करतानाही निदर्शनास आलंय. 


सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ग्राहकांचं हित लक्षात घेता मंत्रालय पीबीओआर विधेयकावर काम करत आहे. हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांची सुविधा आणि त्यांचं हित लक्षात घेऊन हे विधेयक बनवण्यात येणार आहे'.