शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये दाखवायचे अश्लील संबंध; 18 OTT प्लॅटफॉर्मवर सरकारची कारवाई
OTT Platforms : केंद्र सरकारने अश्लिल कंटेट सोशल मीडियावर टाकणाऱ्या अनेक प्लॅटफॉर्म, वेबसाइट आणि सोशल मीडिया अकाऊंवर कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल 18 ओटीटी प्लॅटफॉर्मचा सहभाग आहे.
OTT Platforms : केंद्र सरकारने अश्लील आणि असभ्य कंटेट प्रकाशित करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. सरकारने अशा सोशल मीडिया अकाउंट, ओटीटी आणि अनेक वेबसाइट्सवर मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मना यापूर्वी अनेकदा इशारा देण्यात आला होता. यासोबतच सरकारने 19 वेबसाइट, 10 ॲप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले आहेत.
इंटरनेटवर अश्लिल व्हिडीओ टाकणाऱ्या अनेक प्लॅटफॉर्म, वेबसाइट आणि सोशल मीडिया अकाऊंवर सरकारने कठोर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 OTT, 19 वेबसाइट, 10 ॲप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मवरून अश्लीलता दाखवली जात होती, ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला अश्लील पद्धतीने मांडले जात होते.
इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन (प्रतिबंध) कायदा, 1986 च्या कलम 4, भारतीय दंड संहितेच्या कलम 292 म्हणजेच IPC आणि IT कायदा 2000 च्या कलम 67 आणि 67A अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सरकारने बेशरम्स, हंटर्स, ड्रीम फिल्म्स, मूडएक्स, निऑनएक्स, एक्स्ट्रामूडसह अनेक प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहेत. या कंपन्या अश्लील कंटेट तयार करत होत्या.
"या प्लॅटफॉर्मवर असलेल्या कंटेटच्या मोठ्या भागात अश्लील व्हिडीओ आणि महिलांना अश्लील रीतीने सादर केले जात असल्याचे आढळले. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकाचे संबंध, कौटुंबिक संबंध अशा अनेक अयोग्य संदर्भांमध्ये अश्लीलता आणि लैंगिक संबंध मांडले जात होते," असे सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
'या' ओटीटी अकाऊंटवर कारवाई
Dreams Films
Voovi
Yessma
Uncut Adda
Tri Flicks
X Prime
Neon X VIP
MoodX
Besharams
Hunters
Rabbit
Xtramood
Nuefliks
Mojflix
Hot Shots VIP
Fugi
Chikooflix
Prime Play