महाराष्ट्रातील एकमेव सुमद्र किनारा जिथं आहे चंद्रकोरच्या आकाराची खोच; कोकणचं छुप सौंदर्य

रत्नागिरीतील  या गावात कोकणचं छुप सौंदर्य पहायला मिळते. 

| Jun 02, 2024, 23:31 PM IST

Unseen Beach of Ratnagiri  Budhal Sada : कोकण म्हणजे स्वर्ग... कोकणात अशी काही ठिकाणी आहेत जी पर्यकांपासून अलिप्त आहेत. यापैकीच एक आहे ते रत्नागिरीतील बुधल सडा. इथल्या समुद्र किनाऱ्यावर चंद्रकोरच्या आकाराची खोच आहे.

 

1/7

दूरवर नजर जाईल तिथवर पसरलेला अथांग समुद्र किनारा... अशी कोकणची ओळख... कोकणातील प्रत्येक समुद्र किनाऱ्याची एक वेगळी ओळख आहे. असाच एक समुद्र किनारा रत्नागिरीमध्ये आहे. 

2/7

गुहागर-वेळणेश्वर रोडवरून उजवीकडे वळणारा फाटा अडूरजवळ बुधलकडे जातो. 

3/7

पांढऱ्या रेतीचा हा समुद्र किनारा पर्यटकांपासून अलिप्त आहे. फारसे पर्यटक येथे फिरकत नाहीत. 

4/7

बुधल सडा गावात 30 ते 40  कोळी लोकांची पारंपरिक घरे आहेत. हे गाव साधारण 1200 वर्ष जुने आहे.  

5/7

 या समुद्र किनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील समुद्रकिनाऱ्यावर चंद्रकोरच्या आकाराची खोच आहे. 

6/7

खडकाळ समुद्राच्या आत असलेल्या खडकाळ फाट्याच्या एका बाजूला एक वेगळा समुद्रकिनारा आहे.  

7/7

रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील बुधल गावात असाच एक छुपा समुद्र किनारा आहे. हे ठिकाण बुधल सडा नावाने ओळखले जाते.