Government Jobs 2023: कामाची बातमी! दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, असा करता येईल अर्ज
government job opportunities: आता सर्वात मोठी बातमी आहे तुमच्या कामाची. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही खास बातमी आहे.
Government Jobs 2023 : देशासह महाराष्ट्र बेरोजगारी खुप मोठी समस्या आहे. महाराष्ट्रात (Maharashtra News) रोजगार वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. याचपार्श्वभूमीवर स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc) ने दहावी पास उमेदवारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर 17 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करु शकतात. यामध्ये मल्टी टास्किंग आणि हवालदार पदांवर भरती केली जाणार आहे.
तुम्ही जर दहावी पास (10th pass candidates) असाल आणि नोकरीच्या शोधात (job opportunities) असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 11,000 हून अधिक रिक्त जागांवर पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. त्यापैकी 10,880 पदे MTS आणि 529 पदे हवालदारासाठी असणार आहेत. याची अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. हा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी देण्यात आली आहे.
वाचा: Dementia Symptoms: मेंदूचा 'हा' आजार तुमची कायमची झोप उडवेल!
तसेच कॉम्प्युटरवर आधारित टियर 1 परीक्षा एप्रिल 2023 मध्ये आयोजित केली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल. सीबीएन (महसूल विभाग) मधील एमटीएस आणि हवालदार या दोन्ही पदांसाठी या भरती मोहिमेसाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत देण्यात आली आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.