Dementia Symptoms: मेंदूचा 'हा' आजार तुमची कायमची झोप उडवेल!

Dementia Symptoms: मेंदूचा असा एक आजार आहे ज्यामुळे तुमची कायमची झोप उडू शकते. जागतिक आरोग्य संघटनेही नुकताच या आजारासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

Updated: Jan 19, 2023, 02:06 PM IST
Dementia Symptoms: मेंदूचा 'हा' आजार तुमची कायमची झोप उडवेल!   title=

Dementia Symptoms: जगभरात माणसांना सध्या झोपेची समस्या सतावते असते. आपण कुणीही त्याला अपवाद नाही. रात्री बारा वाजून जातात तरी लोक झोपत नाहीत. काही झोपतात  पण त्यांना झोपच येत नाही. काहींना अचानक जाग येते, विचित्र स्वप्न पडतात, भीती वाटते, दचकून जाग येत. शांत झोपच लागत नाही असं तुमचं होतयं का? असं होत असेल तर हा एक गंभीर आजार असू शकतो. याचपार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेही एक अहवाल सादर केला असून यामध्ये स्मृतिभ्रंश किंवा डिमेंशिया (Dementia) हे आज जगभरातील मृत्यूचे सातवे प्रमुख कारण असल्याचे म्हटले आहे. 

स्मृतिभ्रंश हा मेंदूचा आजार असून ज्यामध्ये मेंदूशी संबंधित विविध गंभीर विकारांचा समावेश होतो. याने ग्रासलेली व्यक्तीमध्ये विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती (Memory), लक्ष, तार्किक तर्क आणि इतर मानसिक क्षमतांमध्ये कमतरता दिसून येते. हे बदल सामाजिक किंवा व्यावसायिक कामकाजात व्यत्यय आणतात त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं अत्यंत महागात पडू शकतं. 

झोपेचा जास्त त्रास

आपण अनेकदा पाहिलं असेल की, वृद्ध व्यक्तींना झोपेचा खूप त्रास होतो. दरम्यान स्मृतिभ्रंश असलेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक गंभीर असते.  स्मृतिभ्रंशाची पातळी वाढली की झोपेच्या समस्या वाढतात. झोपेत असताना वाईट स्वप्ने पडतात आणि झोपेतून अचानक जागे होतो. त्याचबरोबर गाढ झोपेत अचानक ओरडत असाल किंवा तुमचे हात पाय हलवत असाल तर ते डिमेंशियामुळे होऊ शकते.

वाचां: Alia Bhatt नंतर Deepika Padukone पण देणार गुड न्यूज? 

स्मृतिभ्रंशची लक्षणे

  • स्मृती भ्रंश होणे (मेमोरी लॉस)
  • लक्ष देण्यात अडचण
  • दैनंदिन कामे करण्यात अडचण
  • वेळ आणि ठिकाणाबद्दल गोंधळ
  • स्वभावामध्ये बदल 

या लोकांना असतो डिमेंशियाचा धोका 

वृद्ध लोकांना स्मृतिभ्रंश होण्याचा सर्वाधिक धोका असतो. 65 वर्षांवरील लोकांपैकी सुमारे 5% ते 8% लोक डिमेंशियाच्या कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त असतात. दर पाच वर्षांनी ही संख्या दुप्पट होते. यासोबतच धूम्रपान, हृदयविकार (Heart disease), मेंदूला दुखापत (brain injury), कौटुंबिक इतिहास (family history), मधुमेह (diabetes), डाऊन सिंड्रोम (down syndrome), स्लीप एपनिया (sleep apnea), खराब जीवनशैली ही या आजाराची मुख्य कारणं आहेत.