तुम्हीही IT कंपनीत काम करता, वाचा सरकारनं लागू केलेला `हा` नवा नियम
लक्षपूर्वक वाचा ही महत्त्वाची बातमी
नवी दिल्ली : Coronavirus कोरोना व्हाययरसचा वाढता प्रादुर्भाव आणि या विषाणूमुळं उदभवलेली अडचणीची परिस्थिती पाहता केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा नव्यानं काही नियम लागू करण्यात आले आहेत. IT आणि BPO क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्यांसाठी त्यांच्या कामाच्या पद्धतीबाबतचे नवे निर्देश केंद्राकडून काढण्यात आले आहेत. ज्याअंतर्गत कोरोनाचं वाढतं संकट पाहता त्यांना देण्यात आलेली घरूनच काम करण्याची सुविधा अर्थात Work From Home या सुविधेच्या कालावधीत आणखी वाढ करण्यात आली आहे.
मंगळवारी याबाबतच अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ज्याअंतर्गत IT आणि BPO या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत घरुनच काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. ३१ जुलै रोजी या सुविधेचा अखेरचा दिवस होता. पण, आता मात्र Work from home मध्ये वाढ करुन देण्यात आल्याचंच स्पष्ट होत आहे.
दूरसंचार विभागाकडून ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली. सद्यस्थितीला या क्षेत्रांमध्ये काम करणारे जवळपास ८५ टक्क्यांहून जास्त कर्मचारी हे घरूनच काम करत आहेत. तर, अत्यावश्कत असल्या कारणामुळं इतर कर्मचाऱ्यांना कार्यालयात जावं लागत आहे.
देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येनं ११ लाखांचाही आकडा ओलांडला आहे. अतिशय वेगानं वाढणारी ही रुग्णसंख्या पाहता संभाव्य संकट टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाची पावलं केंद्र आणि राज्य शासनांकडून उचलण्यात येत आहेत.