Crime News: नवी नोकरी असली की उज्ज्वल भविष्यासाठी स्वप्नं पाहत ती अगदी इमानदारीने करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यात सरकारी नोकरी असली की, मग आयुष्यभराच्या रोजगाराची सोय झाली असल्याने अनेकजण निवांत असतात. अनेक सरकारी कर्मचारी लाच घेतात ही बाब तशी काही नवी नाही. पण एखाद्या कर्मचाऱ्याने पहिल्याच पोस्टिंगला लाच घेतली तर आश्चर्य वाटेल ना. पण अशीच एक घटना घडली आहे. झारखंडच्या हजारीबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) लाच घेताना महिला सरकारी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथाली शर्मा असं या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे. आठ महिन्यांपूर्वी झारखंडच्या कोडरमा येथे सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधक म्हणून त्यांची नियुक्त झाली होती. ही त्यांची पहिलीच पोस्टिंग होती.


7 जुलै रोजी मिथाली शर्मा यांना हजारीबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) अटक केली आहे. मिथाली शर्मा लाच घेतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. अटकेनंतर एसीबीने मिथाली शर्मा यांना पुढील कारवाईसाठी हजारीबागला नेलं आहे. याप्रकरणी अद्याप तपास सुरु आहे. 


या अटकेची माहिती देताना एसीबी अधिकाऱ्याने सांगितलं की, मिथाली शर्मा यांनी कोडरमा व्यापार सहयोग समितीवर अचानक धाड टाकत तपासणी केली होती. तपासणीदरम्यान त्यांना तिथे काही विसंगती आढळल्या होत्या. त्यांच्यावर कारवाई न करण्याच्या बदल्यात त्यांनी 20 हजारांची लाच मागितली होती. समितीचे सदस्य रामेश्वर प्रसाद यादव यांनी लाच मागितल्याच्या दुसऱ्या दिवशीच एसीबीच्या डीजींकडे तक्रार दाखल केली होती. 


तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने याप्रकरणी तपास केला आणि मिथाली शर्मा यांनी समितीकडून 20 हजारांची लाच मागितली असल्याची खात्री पटली. यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला आणि मिथाली शर्मा यांच्याभोवती जाळं टाकलं. यानंतर 7 जुलैला एसीबीने मिथाली शर्मा यांना मागितलेला लाचेमधील पहिला हफ्ता देण्यासाठी पाठवलं. यानंतर त्यांना 10 हजार रुपये घेताना घेताना रंगेहाथ पकडल.