ड्रायव्हरची तब्येत बिघडली म्हणून बुलढाण्यातील `त्या` सरकारी अधिकाऱ्याने पाळला रोजा
भारतात `गंगा-जमनी तहजीब ` अजूनही टिकून आहे.
बुलढाणा: भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये धार्मिक तणाव वाढल्याच्या बातम्या आपल्या दररोज कानावर पडत असतात. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यानही नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे याचा प्रत्यय आला होता. मात्र, या सर्व आघातांनंतरही काही अपवादांमुळे भारतात 'गंगा-जमनी तहजीब ' अजूनही टिकून आहे.
महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील एका घटनेने पुन्हा एकवार त्याचा प्रत्यय आला आहे. बुलढाण्यातील वनखात्याचे विभागीय अधिकारी संजय माळी यांनी आपल्या कृतीने अनेकांना नवा आदर्श घालून दिला आहे. संजय माळी यांना वनखात्याकडून सरकारी वाहन देण्यात आले आहे. जाफर नावाची व्यक्ती या गाडीवर चालक म्हणून कामाला आहे. सध्या रमजानचा महिना सुरु असल्यामुळे जाफर रोजे पाळत होता.
रोजा असतानाही मॅच खेळले हे दोन खेळाडू, धवनने केला सलाम
मात्र, ६ मे रोजी त्याची तब्येत अचानक बिघडली. कामाच्या व्यापात तब्येतीवर परिणाम होत असल्याने आपल्याला रोजा पाळता येत नसल्याचे त्याने संजय माळी यांना सांगितले. तेव्हा संजय माळी यांनी तुझ्याऐवजी मी रोजा पाळेन, असे सांगितले. संजय माळी यांच्या या कृतीचे समाजातील अनेक स्तरांवरून कौतुक होत आहे.