नवी दिल्ली : दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा काळ्या पैशाच्या चर्चांनी जोर धरला आहे. संसदेत या मुद्द्याला चालना मिळाल्यामुळं साऱ्या देशाचं लक्ष इथं वेधलं गेलं आहे. काँग्रेस खासदार विंसेट एच पाला यांनी सरकारला उद्देशून मागील 10 वर्षांमध्ये स्वीस बँकेत किती काळा पैसा जमा झाला आहे, असा प्रश्न विचारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारनं काळा पैसा परत आणण्यासाठी किती पावलं उचलली, या प्रकरणी किती जणांना ताब्यात घेण्यात आलं, किती जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आणि कोणाकडून कशा पद्धतीनं हे काळं धन परत आणलं जाणार आहे, असे अनेक प्रश्न त्यांनी थेट सरकारपुढे उपस्थित केले. 


काळ्या पैशांसंदर्भातील प्रश्नाचं उत्तर देत सरकार म्हणतं.... 
विरोधी पक्षाच्या या प्रश्नावर राज्य अर्थमंत्र्यांनी उत्तर दिलं. मागील 10 वर्षांमध्ये स्वीस बँकेमध्ये किती काळा पैसा जमा झाला आहे, याची कोणतीही अधिकृत माहिती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मागील काही वर्षांमध्ये सरकारकडून काळा पैसा परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आल्याचंही ते म्हणाले. 


GOLD Price संदर्भात मोठी बातमी : सोन्याचा आजचा दर, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी


 


अनेक खटले दाखल 
सरकारनं दिलेल्या माहितीनुसार 107 ब्लॅक मनी अॅक्ट अंतर्गत जवळपास 100 हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. या कायद्याच्या कलम 10(3)/10(4) अन्वये 31 मे 2021 पर्यंत 166 प्रकरणांमध्ये असेसमेंट ऑर्डरही जारी करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 8216 कोटी रुपयांची रक्कमही गोळा करण्यात आली आहे. शिवाय HSBC  केसअंतर्गत जवळपास 8,465  कोटी रुपयांच्या अघोषित करावर पेनल्टीची रक्कमही लावण्यात आली आहे. ज्याचा आकडा 1294 कोटी रुपये इतका आहे. 


ICIJ (International Consortium of Investigative Journalists)  प्रकरणात 11,010 अघोषित कराचा आकडा समोर आला आहे. तर, पनामा आणि पॅराडाईज पेपर प्रकणी अनुक्रमे 20,078 कोटी रुपये आणि 246 कोटी रुपये अघोषित रक्कम समोर आली आहे.