मुंबई : येत्या डिसेबरच्या अखेरील एक हजाराची नोट नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह परत एकदा चलनात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय.  'झी मीडिया'चे सहकारी वृत्तपत्र  'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार नव्या एक हजाराच्या नोटेसाठी सध्या डिझाईन तयार करण्याचं काम सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या नोटांची छपाई म्हैसूर आणि सालबोनीमध्ये  करण्यात येणार असून त्यासाठी  टाकसाळ सज्ज आहेत. आठ नोव्हेंबर २०१६ मध्ये जुन्या पाचशे आणि एक  हजाराच्या  नोटा चलनातून बंद करण्यात आल्या. त्यानंतर नव्या पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा चलनात आल्या. 


गेल्या सहा महिन्यात २००० हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आलीय. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी २०० रुपयाची नोट चलनात आली. त्याचप्रमाणे नव्या २०० च्या नोटाची छपाई जोरात सुरू आहे.   


सध्याच्या परिस्थिती पाचशे रुपयांनंतर थेट २००० हजाराची नोट चलनात आहे. त्यामुळे व्यवहारामध्ये अनेक अडचणी येतात. पाचशे आणि दोन हजारांच्या चलनातली दरी भरून काढण्यासाठी एक हजाराची नोट पुन्हा चलनात आणण्यात येणार असल्याचे सूत्रांचं म्हणणे आहे.