Government Puts Wikipedia: भारत सरकारकडून Wikipedia ला नोटिस बजावण्यात आली आहे. तसंच, काही तक्रारींवर उत्तर मागितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने मंगळवारी विकीपीडियाला नोटिस बजावली आहे. विकीपीडियावरील पक्षपाती भूमिका आणि अनेक चुका असल्याबाबतच्या तक्रारी निदर्शनास आणून दिल्या आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, इंटरनेट इनसायल्कोपीडीयाला लिहलेल्या नोटिसमध्ये म्हटलं आहे की, संपादकांच्या एका समूहाचा त्यातील मजकूरावर नियंत्रण आहे. त्यामुळं त्यातील मजकूर तयस्थ नाहीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे की, विकिपीडियाला मध्यस्थाऐवजी प्रकाशक म्हणून का समजू नये? विकीपिडीयाच्या माहितीमध्ये  तटस्थता नाही असाही आरोप त्यामध्ये करण्यात आला आहे. मात्र, अद्याप सरकार व विकीपीडियाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाहीये.


Wikipedia प्लॅटफॉर्म काय आहे?


Wikipedia हा एक फ्री प्लॅटफॉर्म आहे. जिथे जगभरातील सर्व माहिती लोक विकीपीडियाच्या माध्यमातून मिळवू शकतात. मात्र, विकीपीडियाच्या लेखात लोक स्वतःहूनही काही गोष्टी अॅड करु शकतात. त्यामुळं ही माहिती बरोबरच असेल असं नाही. 2001मध्ये इंग्रजीतून याची सुरुवात झाली होती. आता इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये विकीपीडिया आहे. विकीपीडियाची सुरुवात जिमी वेल्स आणि लैरी सँगर यांनी केली होती. 


ANIने देखील केली होती केस 


जवळपास दोन महिन्यांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने विकीपीडियाला खडे बोल सुनावले होते. तुम्हाला भारत आवडत नसेल तर इथे काम करु नका, सरकारला तुमची वेबसाईट बंद करायला सांगू, असं उच्च न्यायालयाने विकिपीडियाला म्हटलं होतं. ANI या वृत्तसंस्थेने विकिपीडियाविरोधात याचिका दाखल केली होती. विकिपीडियावरील एका मजकुरात वृत्तसंस्थेचा वर्णन सरकारच्या प्रचाराचे साधन असं करण्यात आलं आहे. ते विकिपीडियावरुन काढून टाकण्याची मागणी ANIने केली होती. तसंच, 2 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा खटला चालवला होता. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप करत वृत्तसंस्थेने 5 सप्टेंबर रोजी विकिपीडिया विरोधात अवमान याचिका दाखल केली होती.