Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी (Ration card holder) महत्त्वाची बातमी आहे. कारण लाखो रेशनकार्ड रद्द (Ration card cancel) केले जाणार आहेत. केंद्र सरकार लवकरच याबाबत निर्णय़ घेणार असून अशा रेशनकार्ड धारकांना मोफतचं रेशन मिळणार नाहीये. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये 10 लाखाहून अधिक रेशनकार्डचा समावेश आहे. जे रद्द केले जाणार आहेत.अशा रेशनकार्डची सरकारने यादी देखील तयार केल्याचं बोललं जात आहे.


मोफत रेशन ही बंद होणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनादरम्यान सरकारने मोफत रेशन योजना सुरु केली होती. देशातील 80 कोटीहून अधिक लोकांना हे रेशन वितरीत केलं जात आहे. मात्र आता जे रेशनकार्ड धारक हे अपात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. सरकारकडून गहू, तांदूळ आणि चणाडाळ मोफत दिली जात आहे.


ज्या लोकांचे रेशनकार्ड रद्द होणार आहेत. अशा रेशनकार्डची यादी डीलरकडे पाठवली जाणार आहे. यानंतर अपात्र व्यक्तींना रेशन देणं बंद केलं जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात हा सगळा डेटा पाठवला जाणार आहे. ज्यानंतर अशा लोकांचं रेशनकार्ड रद्द केलं जाणार आहे.


टॅक्स भरताय तर रेशन नाही


NFSA च्या माहितीनुसार, जे रेशनकार्ड धारक इनकम टॅक्स भरतात. ज्यांच्याकडे 10 बिघा पेक्षा अधिक जमीन आहे. त्या लोकांना मोफत रेशन मिळणार नाहीये. जे लोकं मोफत मिळालेलं धान्य बाहेर विकत असतील अशा लोकांचं देखील रेशनकार्ड रद्द केलं जाणार आहे.