तिरुवनंतपूरम : साधारणपणे आपण सुट्टीत काय करतो ? मज्जा मस्ती, दंगा. नाहीतर एखादा क्लास. म्हणजे नृत्याचा, गाण्याचा, चित्रकलेचा किंवा आपल्या आवडत्या छंदाचा. मात्र यंदा ख्रिसमसच्या सुट्टीत केरळमधील शालेय विद्यार्थ्यांना अनोखी शिकवण मिळणार आहे. 


हे प्रशिक्षण देणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमधील तिरुवनंतपूरम राज्यातील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना अॅप बनवण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. कंप्यूटर विज्ञान क्षेत्रातील विशेषज्ञ मोबाईल अॅप बनवण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. राज्य सरकार द्वारा संचालित केरल इंफ्रास्ट्रक्चर अॅण्ड टेक्नोलॉजी फॉर एजुकेशन (काइट) ने शालेय विद्यार्थ्यांना यासंबंधीत प्रशिक्षण देण्याची तयारी केली आहे.


काइट संस्था


काइट ही संस्था 'आयटी अॅट स्कूल' म्हणून देखील प्रसिद्ध आहे. हे प्रशिक्षण ‘कुट्टीकोटम’चे सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल. कुट्टीकोटम विद्यार्थ्यांचे आयटी नेटवर्क आहे. सप्टेंबरमध्ये देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा हा पुढील टप्पा असेल.  


सर्वात मोठे आयटी नेटवर्क


काइट चे व्हाईस चेअरमन आणि कार्यकारी डिरेक्टर के. अनवर सदत यांनी सांगितले की, काइटने हाय-स्कूल कुट्टीकोटम सारखा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. आठवी, नववी आणि दहावीच्या १ लाख विद्यार्थ्यांना प्रौद्योगिक प्रशिक्षण देणे हे यामागचे उद्देश आहे. हे देशातील विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे आयटी नेटवर्क आहे.