मुंबई : अंतरिम बजेट 2019 मध्ये लॉन्‍ग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स (LTCG) संपवला जाऊ शकतो. किंवा याची सीमा एक लाखाच्या वर केली जाऊ शकते. शेअर बाजारासाठी ही आनंदाची बातमी आहे. झी मीडियाला मिळालेल्या एक्‍सक्‍लूझिव माहितीनुसार लॉन्‍ग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स संपवला जाऊ शकतो किंवा त्याची मर्यादा एक लाखाच्या वर केली जाऊ शकते. किंवा काही स्लॅब देखील केले जाऊ शकतात. 
  
बजेटमध्ये जर हा निर्णय घेण्यात आला तर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही खूशखबर ठरु शकते. यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील वाढू शकते. केंद्र सरकारने मागच्या वर्षी शेअर बाजारातून होणाऱ्या कमाईवर LTCG टॅक्स लावला होता


एलटीसीजी टॅक्स काय आहे?


गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये सरकारने एलटीसीजी कर लागू केला होता. या अंतर्गत, एक वर्षानंतर किंवा त्यापेक्षा अधिक वेळेत शेअर विक्री केल्यानंतर त्याला एक लाख रुपयांपेक्षा अधिक नफा झाल्य़ास त्यावर 10% कर लागत होता.