पुणे : शीख बांधवांनी भारताला जोडण्याचं काम केलं असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणाचा उल्लेख न करता त्यांनी कोपरखळी लगावली. पुण्यामध्ये 'गुरू ग्रंथ साहिब प्रकाशन संत नामदेव' या सुषमा नहार संपादित विशेष आवृत्तीचं प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.पुणे विद्यापीठात हा प्रकाशन सोहळा पार पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतामधील प्रत्येक महिलेत मला माता दिसून येते त्या देव्या आहेत. आपली भूमी श्रेष्ठ भूमी आहे. सुषमा नहार यांचे परिश्रम असतांना त्या इथं का नाही विचारलं होतं. मात्र त्यांचे पती आहे असं कळलं पण त्या असायला पाहिजे होत्या. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं कळलं पण त्यांना शुभेच्छा आहेत.



भारत जिंकायला बाहेरचे लोक आले होते. त्यांना वाटलं असेल धरतीवर आत्मा आहे पण तसं नाहीये. भारताचा आत्मा धर्मावर आहे. येथील संत, साहित्य, मंदिर यांच्यावर भारताचा आत्मा आहे. इंग्रजांनी देशाला गुलाम बनविण्याचं काम केलं. धर्म आणि साहित्य काढलं तरच हा देश मरेल असं विवेकानंद म्हटले होते. भारत या देशाच्या आत्म्याचा कधी तुकडा झाला नाही असेही ते म्हणाले. 
 
संत, साहित्याने देशाला वाचवलं आहे. त्यात नामदेव महाराजांचा समावेश आहे. पंजाबमध्ये शीख पंथाची स्थापना केलीय. गुरू नानक यांनी पूजा केलीय. लोक आता म्हणतात माझी पूजा करा, यावरून वाद होतात. गुरू नानक यांनी असा वाद केला नाही. अलीकडे छोट्या छोट्या गोष्टी वरून वाद होतात. लोकांमध्ये आता आस्था राहिली नाही, अनास्था निर्माण झाल्याचे ते म्हणाले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी प्रयत्न करताय. संतांनी यासाठी काम केलंय. आपल्यासाठी ते हिरे मोती आहे. आपण त्यांच्या दिशेने चाललं पाहिजे, तरच त्यांची जयंती साजरी करण्याचं सार्थक होईल असेही राज्यपाल पुढे म्हणाले.