Udayanraje Bhosle : राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य : पंतप्रधानांच्या भेटीनंतर उदयनराजे यांची भूमिका मवाळ
Udayanraje Bhosle : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या भेटीनंतर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांची भूमिका मवाळ झाली आहे.
Udayanraje Bhosle : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या भेटीनंतर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांची भूमिका मवाळ झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी काढलेल्या उदगाराबाबत राष्ट्रपतींना दिलेल्या पत्राची दखल घेण्यात आली आहे. आज पीएमओला उदयनराजे यांच्याकडून आणखी एक पत्र देण्यात आले आहे, असं उदयनराजे म्हणाले. आता पुढील कारवाई प्रक्रियेनुसार होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यपालांनी अजून माफी मागितली नाही याची खंत वाटते, पण कोणाच्या चुकीच्या वक्तव्यामुळे संपूर्ण पक्षाला दोष देता येणार नाही, असंही उदयनराजे म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी (controversial statement) भाजपचे खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosle) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांची भूमिका मवाळ झाल्याचे पाहायला मिळाले.
राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केले यावर पंतप्रधान कार्यलयाकडे पत्र दिले आहे.शिवाजी महाराजांबद्दल योग्य विधान करणे गरजेचे आहे. राज्यपालांनी तोलून मापून बोलायला हवे आहे. राज्यपाल विषयावर लवकरात लवकर तोडगा निघायला पाहीजे. मात्र, राज्यपालांनी जे वक्तव्य केले आहे. त्याबाबत वादग्रस्त वक्तव्याला पक्ष भाजपचे समर्थन असे होत नाही, असे उदयनराजे म्हणाले. आम्ही रायगडावर देखील जाऊन आमची भूमिका मांडली आहे. हे चालतं असे जर काेणाला वाटत असेल तर ते चांगले लक्षण नाही. राष्ट्रपती यांच्यापर्यंत सर्वबाबी पाेहोचल्या आहेत. त्याची दखल घेतली जाईल अशी मला खात्री आहे, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी राजांबद्दल अवमानकारक वक्तव्य हाेत असल्याने राज्यातच नव्हे तर देशात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. ही बाब पंतप्रधान माेदी यांच्या कार्यालयापर्यंत देखील पाेहोचली आहे. हा काेणत्याही आघाडीचा किंवा पक्षाचा विषय नाही. हा राजकीय विषय नाही. देशातील सर्व शिवभक्त नाराज आहेत. त्यामुळे प्रत्येकाची भावना जी माझी आहे तीच सर्वांची आहे. राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केले, यावर पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्र दिले आहे. शिवाजी महाराजांबद्दल योग्य विधान करणे गरजेचे आहे. 26 खासदार मोदींसोबत बैठकीला होतो. त्यांना अनेक मिटींग होत्या. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला. यावर मी राष्ट्रपतींना पत्र लिहलं होते. ते पत्र गृहमंत्रालयाला पाठवले होते, अशी माहिती उदयनराजे यांनी दिली.