Senthil Balaji: राज्यपालांनी केली थेट आमदाराची मंत्रिमंडळातून हकालपट्टी; मुख्यमंत्री आक्रमक, राजकारण तापणार!
R N Ravi Expels MLA Senthil: कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money laundering) तमिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी यांना राज्यपालांनी कॅबिनेटमधून तात्काळ बरखास्त केलं आहे.
Tamilnadu V Senthil Balaji News: तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी (Governor R.N. Ravi) यांनी धक्कादायक निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money laundering) तमिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी यांना कॅबिनेटमधून तात्काळ बरखास्त केलं आहे. व्ही. सेंथील बालाजी (V Senthil Balaji) सध्या तुरुंगात आहेत. अशातच राज्यपालांनी मोठा निर्णय घेतल्याने आता मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (M. K. Stalin) आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.
तमिलनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांत गंभीर फौजदारी कारवाई सुरू आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी (Tamilnadu Governor) मोठा निर्णय घेतला. राजभवनाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. राज्यपालांच्या तडकाफडकी कारवाईमुळे आता तमिळनाडूमधील राजकारण तापल्याचं पहायला मिळतंय. राज्यपालांचा निर्णय म्हणजे एम.के. स्टॅलिन यांना मोठा झटका असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे येत्या काही दिवसात राजकारण तापण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कायदेशीर चौकटी देखील धुसर होण्याची शक्यता आहे.
राजभवनाची प्रेस नोट
मंत्र्याची हकालपट्टी केल्यानंतर राजभवनाने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामध्ये आमदार सेंथील बालाजी यांची तात्काळ प्रभावानं हकालपट्टी करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. तुरुंगवास भोगावा लागल्यानंतरही बालाजी यांचं मंत्रिमंडळात कायम राहिल्यास कायद्याच्या योग्य प्रक्रियेवर विपरित परिणाम होईल, असं प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे.
राज्यपालांना घटनात्मक अधिकार आहे का?
आमदार बालाजी यांना बडतर्फ करणारे राज्यपाल कोण आहेत? त्यांना घटनात्मक अधिकार आहे का? ते सनातन धर्मानुसार कार्य करत आहेत पण सनातन धर्म हा आपल्या देशाचा कायदा नाही. आपलं संविधान आपलं बायबल, गीता, कुराण आहे. आम्ही त्यांना संविधान नीट वाचण्याची विनंती करतो. त्याच्याकडे अधिकार नाही, तो आपल्या बॉसला खूश करण्यासाठी अशा पद्धतीने काम करत आहे, अशी टीका डीएमके नेता सरवनन अन्नादुरई यांनी केली आहे.
आणखी वाचा - Modi मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता, दक्षिणेतल्या 'या' सुपरस्टारची वर्णी लागणार?
दरम्यान, मनी लाँडरिंग प्रकरणी तामिळनाडुचे उर्जामंत्री वी सेंथिल बालाजी यांच्यासह निकटवर्तीयांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात छापे टाकले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणीसाठी चेन्नईतील एका सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तेव्हा मंत्री सेंथिल बालाजी यांना रडू कोसळलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.