नवी दिल्ली : काळा पैसा रोखण्यासाठी सरकार आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. काळ्या पैशांनी सोने खरेदी करणाऱ्यांवर आळा बसण्यासाठी सरकार विशेष योजना आणत आहे. आयकरच्या एमनेस्टी योजनेच्या आधारावर सोन्यासाठी देखील एमनेस्टी योजना सरकार आणू शकते. ही योजना कॅबिनेटमध्ये आणून तिला मंजूरी दिली जाऊ शकते. असे झाले तर मोदी सरकारचे हे दुसरे मोठे पाऊल ठरु शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळा पैसा सोन्यात गुंतवण्याच्या नसा आवळण्याच्या तयारीत सरकार आहे. या नव्या योजनेअंतर्गत सोन्याची किंमत ठरवण्यासाठी वॅल्यूएशन सर्टिफिकेट गरजेचं असणार आहे. बिना पावतीचे जितकेही सोने खरेदी केले जाईल त्यावर त्या प्रमाणात आयकर द्यावा लागणार आहे. ही योजना ठराविक वेळेसाठी आणली जाऊ शकते. याचा कालावधी संपल्यानंतर कोणाकडे जास्त सोने आढळल्यास त्याला दंडाची मोठी रक्कम द्यावी लागू शकते. 



मंदीर आणि ट्रस्टकडे असलेले सोनेदेखील प्रोडक्टिव्ह गुंतवणूक म्हणून वापरण्याची घोषणा होऊ शकते. देशाच्या अर्थ मंत्रालयातर्फे ही योजना आणली जाऊ शकते. अर्थ विभागाने आपला प्रस्ताव कॅबिनेटकडे पाठवला आहे. कॅबिनेटकडून लवकरच याला मंजूरी मिळू शकते. 


ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात यावर चर्चा होणार होती. पण महाराष्ट्र आणि हरियाणा येथील निवडणुकांमुळे या निर्णय त्यावेळी टळला.