नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) देशभरातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना टेस्टची संख्या वाढवण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. सध्याच्या घडीला देशभरात दिवसाला साधारण १५ हजार कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये दिवसाला एक लाख कोरोना टेस्ट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी ३० एप्रिलपर्यंत देशभरात आणखी ३०० कोरोना लॅब उभारण्याचा सरकारचा मानस आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबतच्या सूचना दिल्या. त्यानुसार येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिवसाला एक लाख टेस्ट करण्याचे लक्ष गाठायचे असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. 


धोका वाढला; महाराष्ट्रात कोरोनाचे १३४ नवे रुग्ण, पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू

मात्र, किटसच्या अपुऱ्या संख्येमुळे यामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (ICMR) आतापर्यंत ५ लाख टेस्ट किटच्या उत्पादनाची ऑर्डर दिली आहे. यापैकी २.५ लाख किटस् पहिल्या टप्प्यात मिळणे अपेक्षित होते. मात्र, याला विलंब लागत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ही किटस् केंद्र सरकारला मिळतील. यानंतर राज्यांना किटचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती ICMRच्या डॉ. गंगाखेडकर यांनी दिली. 


मुंबईत कोरोनाचे आणखी २ हॉटस्पॉट वाढले


दरम्यान, मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून धारावी परिसरात नागरिकांच्या रॅपिट टेस्ट केल्या जाणार आहेत. यासाठी केवळ केंद्र सरकारच्या मदतीवरच अवलंबून न राहता मुंबई महानगरपालिकेने दक्षिण कोरियाला एक लाख किटसची निर्मिती करण्यासाठी ऑर्डर दिली आहे. ही किटस मिळाल्यामुळे राज्यभरात कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढवता येईल. सध्याच्या घडीला देशातील इतर भागांच्या तुलनेत मुंबईत कोरोना टेस्टचा वेग खूपच जास्त आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत ्असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.