मुंबईत कोरोनाचे आणखी २ हॉटस्पॉट वाढले

कोरोना हॉटस्पाट असलेले विभागांच्या संख्येत आज २ ने वाढ 

Updated: Apr 12, 2020, 03:38 PM IST
मुंबईत कोरोनाचे आणखी २ हॉटस्पॉट वाढले  title=

मुंबई : मुंबईत अतिगंभीर म्हणजेच कोरोना हॉटस्पाट असलेले विभागांच्या संख्येत आज २ ने वाढ करण्यात आली आहे. कालपर्यंत मुंबईत ५ हॉटस्पॉट विभाग होते. आता त्यात एल विभाग कुर्ला आणि एम पूर्व चेंबूर, गोवंडी विभागांची भर पडली आहे.

दरम्यान वरळीचा समावेश असलेला जी साऊथ वॉर्ड रुग्णसंख्या २४६ वर पोहोचली आहे. भायखळ्याच्या ई विभागाताही रूग्णांची शंभरी ओलांडली असून इथं १११ रूग्ण झाले आहेत. 

नाना चौक मलबार हिल परिसर असलेल्या डी विभागात ९४ तर गोवंडी, चेंबूर भागाचा समावेश असलेल्या एम ईस्ट मध्ये ७० रुग्ण झाले आहेत. वांद्रे पूर्वच्या एच पूर्व विभागात ६७ रूग्ण, अंधेरी पश्चिम भाग असलेल्या के पश्चिममध्ये ६१ रूग्ण तर कुर्ला भागाचा समावेश असलेल्या एल वॉर्ड मध्ये ५७ रुग्ण आहेत. 

मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई 

मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीवर मुंबई महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.  मालाड पूर्व येथील रहेजा टाऊनशिप भागात तोंडावर मास्क न लावता एक व्यक्ती फिरत असल्याची तक्रार पालिकेच्या पी उत्तर विभागाकडे आली होती. 

त्यानंतर पालिकेनं पोलिसांच्या मदतीनं त्याच्यावर कारवाई करत १ हजार रूपयांचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेने दिले होते. त्यानुसार ही पहिली कारवाई करण्यात आली.