तुम्हालाही सरकारी नोकरीची अपेक्षा असेल तर...
तुम्हालाही सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर कदाचित ही बातमी वाचून तुमच्यासाठी निराशादायक ठरू शकते.
नवी दिल्ली : तुम्हालाही सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर कदाचित ही बातमी वाचून तुमच्यासाठी निराशादायक ठरू शकते.
कारण, सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना मोदी सरकार धक्का देण्याच्या तयारीत आहे.
मंत्रालयात गेल्या कित्येक वर्षांपासून रिकाम्या असणारी पदांवर यापुढेही नियुक्त्या होणार नाहीत. सरकारच्या सर्व मंत्रालय आणि विभागांत पाच वर्षांपासून रिक्त झालेल्या पदांवर नव्या नियुक्त्या करण्याऐवजी या रिकाम्या जागाच नष्ट करण्यात याव्यात, असा विचार केंद्र सरकारमध्ये सुरू आहे.
अधिक वाचा : एक असाही मुख्यमंत्री ज्यांनी आजपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलंच नाही...
केंद्र सरकारनं याचसंबंधी सर्व मंत्रालय आणि विभागांना विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
यावर काही विभागांनी आणि मंत्रालयांनी उत्तर दिलंय परंतु, काहींनी व्यापक अहवाल देण्याऐवजी काही सूचना दिल्या आहेत.
अधिक वाचा : बजेट 2018: अर्थमंत्री करु शकतात हे 5 मोठे बदल
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारमध्ये काही हजार पदं गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून रिक्त आहेत.