नवी दिल्ली : गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या ताटात हमखास आढळणाऱ्या खिचडीला आता सरकार भारताचा राष्ट्रीय पदार्थ म्हणून घोषित करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या ४ तारखेला प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या देखरेखीखाली दिल्लीत ८०० किलोंची खिचडी शिजवण्यात येणार आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात खिचडी शिजवण्याचा हा विश्वविक्रम असेल. 


या विक्रमाला केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाचं पाठबळ मिळणार आहे. दिल्लीत सीआयआय आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानं 'द ग्रेट इंडियन फूड स्ट्रीट' नावाचं एका फूड फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंय. 


या फूड फेस्टिव्हल अंतर्गत मंत्रालयातर्फे शेफ संजीव कपूर यांना भारतीय पाककलेचे ब्रँड अॅम्बेसिडर नेमण्यात आलंय. संजीव कपूर यांच्या देखरेखीत तयार होणाऱ्या खिचडीची पाककृती जगभरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.