Gratuity Rules : महिन्याला एक ठराविक रक्कम खात्यात जमा होते आणि तो दिवस नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठा दिवस ठरतो. महिन्याभराच्या रखडलेल्या कामांपासून ते अगदी घरखर्चापर्यंतचे प्रश्न याच पगारातून (Salary) सोडवले जातात. नोकरदार वर्गामध्ये चर्चेत असणाऱ्या मुद्द्यांमध्ये पगारासोबतच दृष्टीक्षेपात असणारा आणखी एक विषय म्हणजे Gratuity. आता ही ग्रॅच्युटी काय, हे आपण इतरांकडून ऐकून, त्यांच्या बोलण्यातून जाणून घेतलं असेल. पण, तुम्हाला माहितीये का जर, तुम्ही एखाद्या खासगी संस्थेत नोकरीला असाल तर ग्रॅच्युटीचे नियम काहीसे वेगळे आहेत. पाहुन घ्या त्याबद्दलची मदतपूर्ण माहिती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोप्या भाषेत सांगावं तर ग्रॅच्युटी म्हणजे कर्मचाऱ्यांना कंपनीकडून देण्यात येणारी एक रक्कम. सातत्यानं कंपनीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नफ्याच्या स्वरुपात ही रक्कम दिली जाते. देशातील बहुतांश कारखाने, खाणी, तेलविहिरी, बंदरं आणि रेल्वे विभागात नोकरदारांना ग्रॅच्युटी लागू आहे. शिवाय 10 हून जास्त लोकांना नोकरी देणाऱ्या संस्था- दुकानंही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी देण्यास बांधिल असतात. 


5 वर्षे एकाच ठिकाणी नोकरी न केल्यास फायदा मिळतो? 


सहसा कोणत्याही संस्थेमध्ये पाच वर्षे किंवा त्याहून जास्त काळासाठी काम केल्यास कर्मचारी Gratuity साठी पात्र ठरतात. पण, काही बाबतीत मात्र हा नियम शिथिल होतो, जिथं पाच वर्षांहून कमी काळ काम केल्यासही ग्रॅच्युटी मिलते. Gratuity Act मधील अनुच्छेद 2A नुसार जर एखाद्या खाणीत काम करणारे कर्मचारी त्यात संस्थेसोबत सातत्यानं 4 वर्ष 190 दिवस पूर्ण करतात तर, त्यांनाही ग्रॅच्युटीचा फायदा मिळतो. इतर संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी ही अट 4 वर्ष 240 दिवस (4 वर्ष  महिने) इतकी आहे. दरम्यान, ग्रॅच्युटीसाठी नोकरीचा कार्यकाळ पाच वर्षांहून तीन वर्षांवर आणण्यासाठी सध्या विचारविनिमय सुरु असून, याचा सर्वाधिक फायदा खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 


हेसुद्धा वाचा : सोशल मीडियावरील कमाईवरही लागणार Tax; काही नवं सुरु करण्याआधी हे वाचा... 


राजीनामा दिल्यास Notice Period ही कार्यकाळाचाच भाग? 


ग्रॅच्युटीच्या हिशोबामध्ये नोटिस पिरियड धरला जात नाही, असाच अनेकांचा समज असोत. पण, नियमानुसार हा कालावधीही कर्मचाऱ्याच्या कार्यकाळाचाच भाग असतो. त्यामुळं ग्रॅच्युटी पिरियडसाठी तोसुद्धा ग्राह्य धरला जातो. 


ग्रॅच्युटी आणि हिशोब.... 


शेवटचा पगार  x (15/26) x तुम्ही कंपनीत काम केलेली वर्ष = ग्रच्युटीची रक्कम असा हा सरळ हिशोब आहे. उदाहरणार्थ जर तुमचा शेवटचा पगार 35000 (मूळ वेतन आणि भत्ता) रुपये असेल तर (35000) x (15/26) x (7) म्हणजेच तुम्ही 1,41,346 रुपये ग्रॅच्युटीसाठी पात्र ठरता. जाणून आश्चर्य वाटेल पण, काही कर्मचाऱ्यांना तब्बल 20 लाख रुपयेही ग्रॅच्युटी मिळाली आहे.