JOB : या कंपनीतील कर्मचारी जास्त आनंदी, या 10 कंपन्या आहेत बेस्ट, पाहा कोणत्या?
नोकरी करण्यासाठी या आहेत टॉप 10 कंपन्या.
मुंबई : Great Place to Work : आपण जॉब बघताना कंपनीतील सुरक्षिता आणि तेथील वातावरण पाहतो. काम करण्यासाठी चांगली कंपनी कोणतीह आहे, हाही विचार करत असतो. आपल्या डोक्यात रिलायन्स, टाटा, बिर्ला आणि मारुती यांचा विचार प्रथम येतो. मात्र, तुम्हाला या कंपन्यांची नावे घेतली तर आश्चर्य वाटेल. कारण यापैकी कोणतीही कंपनी काम करणासाठी भारतात सर्वोत्कृष्ट कंपनी नाही. तर या आहेत टॉप 10 कंपन्या.
क्रमांक 1- DHL Express
डीएचएल एक्सप्रेस (DHL Express) भारतात काम करणारी सर्वोत्कृष्ट कंपनी आहे. या कंपनीने ग्रेट प्लेस टू वर्कद्वारे जाहीर केलेल्या 2021 मध्ये काम करण्यासाठी भारताच्या 100 बेस्ट कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. डीएचएल एक्सप्रेसमध्ये (DHL Express) 2000 हून अधिक लोक काम करतात.
क्रमांक 2- Mahindra and Mahindra
ही यादी दरवर्षी येते, ग्रेट प्लेस टू वर्क दरवर्षी 500 हून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांचे सर्वेक्षण करून भारतातील 100 सर्वोत्कृष्ट कंपन्यांची निवड करते आणि त्यांचा क्रमांक लागतो. हेतूपूर्ण आणि कठीण कार्यस्थळांच्या संस्कृतीचे मूल्यांकन करुन ही यादी तयार केली आहे. डीएचएल एक्स्प्रेसनंतर ऑटो कंपनी महिंद्र आणि महिंद्रा (Mahindra and Mahindra) ऑटोमोटिव्ह आणि फार्म इक्विपमेंट सेक्टर दुसर्या क्रमांकावर आहेत. या कंपनीत सुमारे 20,000 कर्मचारी काम करतात. ही कंपनी एसयूव्हीपासून प्रीमियम लक्झरी युटिलिटी वाहनांपर्यंत सर्व काही तयार करते. हलकी, अवजड व्यावसायिक वाहने ते तीन चाकी वाहनांचे उत्पादन.
क्रमांक 3- Intuit India
तिसरा क्रमांक इंट्युट इंडिया (Intuit India) या व्यवसाय आणि वित्तीय सॉफ्टवेअर कंपनीने मिळविला आहे. या छोट्या कंपनीत 1000 लोक काम करतात. ही कंपनी आर्थिक, लेखा आणि कर तयारीशी संबंधित सॉफ्टवेअर बनवते आणि विकते. त्याचे ग्राहक छोटे व्यवसाय, अकाऊंटन्स आणि वैयक्तिव्यक्ती देखील आहेत.
क्रमांक 4- Aye Finance
2021 मध्ये काम करणार्या भारताच्या 100 सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत गुडगाव येथील आय फायनान्स (Aye Finance) चौथ्या क्रमांकावर आहे. ही एक नवीन युगातील फायनान्स कंपनी आहे. जी भारतातील एमएसएमई (MSME) क्षेत्रातील सूक्ष्म उद्योगांना व्यवसाय कर्ज पुरवते. याची स्थापना व्यावसायिक बॅंकर संजय शर्मा आणि विक्रम जेटली यांनी 2014 मध्ये केली आहे.
क्रमांक 5- Synchrony
या यादीतील पाचव्या क्रमांकावर सिंक्रोनी (Synchrony) आहे, जी ग्राहक सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीत सुमारे 4,000 लोक काम करतात. ही 2020 मधील 27 क्रमांकावरून 2021 मध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
याशिवाय ज्या कंपन्यांनी पहिल्या दहामध्ये आपले स्थान बनविले आहे त्या पुढील प्रमाणे आहेत
6. हॅरिसन मल्याळम लिमिटेड (Harrisons Malayalam Limited)
7. सेल्सफोर्स (Salesforce)
8. अॅडोब (Adobe)
C. सिस्को सिस्टीम्स इंडिया (Cisco Systems India)
10. बार्बेक-नेशन हॉस्पिटॅलिटी (Barbeque-Nation Hospitality)