अर्धा तास गप्पा मारल्या, मिठी मारली नंतर गोळी झाडली... मैत्रिणीची हत्या करुन मित्राची आत्महत्या
Crime News: नोएडातल्या शिव नाडर युनिव्हर्सिटीत (Shiv Nadar University) अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याने विद्यापिठाच्या समोरच आपल्या मैत्रिणीला गोळ्या झाडून तिची हत्या केली.
Youth shot Girl and Shot himself in Greater Noida: राज्याची राजधानी दिल्लीला लागून असलेला ग्रेटर नोएडा (Greater Noida) हा भाग एका भयानक घटनेने हादरला. शिव नाडर युनिव्हर्सिटीत (Shiv Nadar University) एका विद्यार्थ्याने आपल्या मैत्रिणीची निर्घृण हत्या करुन स्वत: आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाची ओळख अनुज अशी झाली असून तो उत्तर प्रदेशमधल्या (UP) अमरोहा इथं राहाणारा आहे. अनुज शिव नाडर युनिव्हर्सिटीत बीएच्या तिसऱ्या वर्षात (BA Third Year) शिकत होता.तर मुलगी उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये (Kanpur) राहाणारी होती. दोघंही चांगले मित्र (Friend) होते अशी माहिती विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दिली आहे. या घटनेनंत विद्यापीठ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलीस अधिक तपास करत आहे.
अर्धा तास गप्पा मारल्या, नंतर गोळी झाडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मुलगा आणि मुलगी शिव नाडर युनिव्हर्सिटीत बीए सोशलॉजीच्या तिसऱ्या वर्षात एकत्र होते. आज दुपारी सुमारे 1.30 ते 2 वाजण्याच्या दरम्यान विद्यापीठ परिसरात दोघं एकत्र गप्पा मारत होते. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. पण त्याचवेळी अचानक अनुजने बंदूक काढली आणि समोर उभ्या असलेल्या मैत्रिणीवर अगदी जवळून गोळी झाडली. यात मुलगी जागीच कोसळली तिला जखमी अवस्थेत यथार्थ रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. अचानक घडलेल्या या घटनेने विद्यापीठात एकच खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
हत्येनंतर केली आत्महत्या
मैत्रिणीची गोळी झाडून हत्या केल्यानंतर अनुज बॉईज हॉस्टेलच्या रुम नंबर 328 मध्ये गेला आणि तिथे त्याने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. यात अनुजचा जागीच मृत्यू झाला. विद्यापीठातल्या इतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनुज आणि मृत विद्यार्थिनी एकमेकांचे चांगेल मित्र होते. पण काही दिवसांपासून त्यांच्या कोणत्या तरी गोष्टीवरुन वाद सुरु होता. पोलिस आता त्या दिशेने तपास करत आहेत.
दरम्यान, दोनही विद्यार्थ्यांच्या घरच्यांना याची घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येची घटना शिव नाडर युनिव्हर्सिटीच्या परिसरात झाली आहे. अनुजकडे बंदूक कुठून आली याचा तपास पोलीस करत आहेत. अनुज आणि मृत विद्यार्थिनी चांगले मित्र असतानाही अनुजने इतकं भयानक पाऊल का उचललं याचा तपासही पोलीस करत आहेत.