Trending Story:लग्नाचा मंडप सजला होता, नववधू नवरदेवाची आतुरतेने वाट पाहत होती. मात्र घडलं भलतंच. उत्तर प्रदेशमधील महाराजगंज येथे एक चक्रावणारा प्रकार समोर आला आहे. लग्नाला काही तास शिल्लक असताना नवरदेवाने केलेला कारनामा ऐकून नवरीच्या पायाखालची जमीनच हादरली आहे. नवरदेवाचे सत्य ऐकून वधुपक्षाने थेट लग्नच मोडलं आहे. (Groom Run Away Before Marriage) 


लग्नाची तयारी केली पण घडलं भलतंच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमधील परसामलिक गावात नवरदेव वरात घेऊन येणार होता. वधुपक्षाकडून सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र, लग्नाचा मुहूर्त टळून गेला तरीही वरात नववधूच्या घरी वरात आली नव्हती. वरात यायला वेळ लागत असल्याचे पाहून नववधूच्या घरातील नातेवाईकांची चिंता वाढली होती. अनेक फोनही नवरदेवाला करण्यात आले. मात्र तिथून काहीच उत्तर येत नव्हते. अखेर वरपक्षाकडून लग्न होऊ शकत नसल्याचा फोन मुलीकडच्यांना करण्यात आला. लग्न मोडल्याचे कारण कळताच एकच गोंधळ निर्माण झाला. नवऱ्याचा कारनामा कळताच नववधुच्या कुटुंबीयांनी रागाच्या भरात नवरदेवाकडे जाण्याचा निर्णय घेतला.


हेसुद्धा वाचाः पत्नी, मुलीला संपवले नंतर उचलले टोकाचे पाऊल; गुगल हिस्ट्री सर्च करताच पोलिसही चक्रावले


 


नवरदेव झाला पसार


वरात निघण्यापूर्वीच वरपक्षाकडील मंडळी नवरदेवाच्या खोलीत गेले. मात्र नवरदेव तिथे नव्हताच. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतल्यास तो लग्नातून पळून गेल्याचे समजले. इतकंच नव्हे तर त्याला हे लग्न मान्य नसून एका मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. हे देखीलनंतर समोर आले. नवरदेवाला हे लग्न मान्य नसल्यामुळंच तो लग्न लागायच्या आधीच प्रेयसीसोबत पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच वर आणि वधु पक्ष कोंडीत सापडले. लग्नाची सर्व तयारी झाली असताना अचानक नवरा पळून गेल्याने पुढे काय करायचं अशा पेचात सर्व पडले. घडलेल्या या घटनेमुळं वधुपक्षातील मंडळी संतप्त झाली होती. 


हेसुद्धा वाचाः तुमच्या किचनमध्ये ठेवाच 'हा' पदार्थ; मधुमेही, कॅन्सर रूग्णांसाठी ठरतो फायदेशीर!


नववधूला बसला मोठा धक्का 


लग्न मंडपातून नवरदेव पळून गेल्याने वधुपक्षाकडील काही नातेवाईक नवरदेवाच्या घरी पोहोचले होते. दोन्ही घरांमध्ये तणावाचं वातावरण होते. लग्नात झालेल्या खर्चावरुन दोन्हीकडील नातेवाईकांमध्ये बाचाबाचीदेखील झाली. बऱ्याचवेळापर्यंत चाललेल्या वादा-वादीनंतर लग्नात झालेला खर्च वधूपक्षाला परत देण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला. दरम्यान, नवरदेवाचे सत्य समजल्यानंतर नववधुला मोठा धक्का बसला होता.