हैदराबाद : जीएसटी परिषदेच्या २१ व्या बैठकीला हैदराबादमध्ये सुरुवात झाली आहे.  जीएसटी लागू झाल्यानंतरची ही तिसरी बैठक आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरु आहे. या बैठकीत विविध वस्तू आणि सेवा यांच्यावरील कर रचनेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


विविध राज्य करसंबंधी विविध प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्याची शक्यता आहे. लक्झरी गाड्यांवरील सेस हटवल्याने राज्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे राज्य सरकार सेस वाढवण्याची मागणी करु शकतात. सेसमध्ये वाढ झाल्यास मध्यम आणि लक्झरी गाड्या महाग होण्याची शक्यता आहे.