नवी दिल्ली : संपूर्ण जगात आणि देशात १ जुलै हा दिवस अनेक ऐतिहासिक घटनांसाठी नावाजला जातो. भारतासाठी देखील १ जुलै हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. किंबहुना त्याला कारणही तसचं आहे. याच दिवशी भारताला नवी कर प्रणाली मिळाली होती. ३० जून २०१७ च्या मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशातील वस्तू व सेवा कर (Goods and Services Tax) म्हणजेच (GST) या नव्या कर प्रणालीची घोषणा करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३० जूनच्या मध्यरात्री घोषणा करण्यात आलेली नवी कर प्रणाली देशात १ जुलैपासून लागू करण्यात आली. नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय मानला जातो. याशिवाय १ जून रोजी अशा अनेक घटना फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात घडल्या, ज्या आज इतिहासात नमुद आहेत. 


१ जुलैच्या इतिहासात नोंदवलेल्या इतर घटना खालीलप्रमाणेः


१७८१ : हैदर अली आणि ब्रिटीश सैन्य यांच्यात युद्ध झाले.


१८५२ : 'सिंध डाक' नावाचे तिकिट सिंधचे मुख्य आयुक्त सर बर्टलफ्रूर यांनी फक्त सिंध राज्य आणि मुंबई कराची मार्गावर वापरण्यासाठी दिले होते.


१८६२ : कलकत्ता उच्च न्यायालयाचे उद्घाटन झाले.


१८७९ : भारतात पॉडकास्टची सुरूवात झाली. 


१९५५ : इम्पीरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले आणि त्याला भारतीय स्टेट बँक असे नाव देण्यात आले.


१९६० : आफ्रिकेचा घाना प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला.


१९६४ : औद्योगिक विकास बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.


१९६८ : अमेरिका, ब्रिटेन, रूस आणि अन्य ५९ देशांमध्ये परमाणु अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 
 
१९७५ : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २० कलमी कार्यक्रमाची घोषणा केली.


१९९१ : वारसा करार भंग झाला.


१९९५ : तैवानविरूद्ध लागू केलेली बंदी उठवण्याची घोषणा अमेरिकेने केली.


१९९६ : जगात पहिल्यांदाच इच्छा मृत्यू कायदा ऑस्ट्रेलियाच्या उत्तर प्रांतात लागू करण्यात आला.