तुम्हाला ओळखता येतेय का खरी डिश कोणती? ओळखा पाहू...
ही कलाकृती साकारली आहे ऋचा यांनी. स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांनी एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे.
Optical Illusion : आपण दररोज अनेक विचित्र बातम्या वाचतो, अनेकांचे व्हिडीओ देखील पाहतो. यातील बहुतांश बातम्या या ट्रेंडिंग किंवा सोशल मीडियावर ( Social media ) व्हायरल कंटेन्टवर ( Viral Content) आधारित असतात. अर्थात अनेकजण त्याला पाहतात, त्याला पसंती देतात म्हणूनच या बातम्या केल्या जातात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात.असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. तुम्ही अनेक पेंटिंग्स किंवा अप्रतिम अशी शिल्पं देखील पहिली असतील. असंच एक पेंटिंग सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झालं ( Viral Paintings) आहे. या कलाकृतीमध्ये एका कलाकाराने पेंटींगच्या माध्यमातून काही खाद्य पदार्थ साकारले आहेत. यांमध्ये डोसा, सांबार, अप्पम, उत्तपा सोबतच पाव भाजीही पाहायला मिळतेय. मात्र यामध्ये एक डिश ही खरी आहे.
ही कलाकृती साकारली आहे ऋचा ( Rucha Limaye) यांनी. स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांनी एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी पेंटिंग्स नवीन घरात पोहोचल्याचं म्हंटलं आहे. मी अप्पम सोबत आणखी एक पावभाजी आणि डोशाचं पेंटिंग बनवलेलं. हे तीनही पेंटिन्स आता आपल्या नव्या घरात आनंदाने राहतायत. हे फोटो शेअर करताना त्यांनी यातील कोणती डिश खरी ( Guess real dish) आहे असा प्रश्नही विचारला आहे.
आधी हा व्हिडीओ पाहा
ऋचा लिमये यांनी शेवटी उत्तपा खरा असल्याचं दाखवलं. हा व्हिडीओ पाहून अनेकांना पहिल्या फटक्यात कोणती डिश खरी आहे हे ओळखता आलं नाही. या व्हिडिओवर वीस हजारांपेक्षा जास्त लाईक्स आलेले आहेत. या व्हिडिओला साडे नऊ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज देखील आलेले आहेत. दिवसेंदिवस या व्हिडीओवरील लाईक्स आणि व्ह्यू वाढताना पाहायला मिळतात. ऋचा यांचे हे पेंटिंग्स पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडलाय.
guess which one is real dish optical illusion on dining table