गुजरात निवडणुक 2017: बाजी पलटली, जनतेचा हात `कॉंग्रेस के साथ`, भाजपला धक्का
भाजपची पिछेहाट सुरू आहे. 182 जागांपैकी कॉंग्रेस 88 जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजप 84 जागांवरच रेंगाळला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का मिळण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्षे एकहाती सत्ता असलेल्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने जोरदार मुसांडी मारली असून, भाजपची पिछेहाट सुरू आहे. 182 जागांपैकी कॉंग्रेस 88 जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजप 84 जागांवरच रेंगाळला आहे.
दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी प्रचंड पिछाडीवर आहेत. जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर हेही जोरदार आघाडीवर आहेत. त्यामुळे गुजरातमधले राजकीय चित्र प्रचंड बदलताना दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाला किंवा अल्पमतात सत्ता आली तरी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी तो प्रचंड मोठा धक्का असणार आहे. दरम्यान, निवडणुकीचे कल क्षणाक्षणाला बदलत आहेत अद्याप कोणतेही चित्र स्पष्ट झाले नाही.
देशाचे राजकारण वेगळ्या टप्प्यावर पोहोचेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजपची एकहाती सत्ता
दरम्यान, गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यासाठी 9 डिसेंबरला (89 विधानसभा जागा) तर, 14 डिसेंबरला (93 विधानसभा जागा ) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशमध्येही निवडणुका पार पडल्या. या मतदानाची एकूण मतमोजणी आज (सोमवार) पार पडत आहे. गुजरात निवडणुकीसाठी 50,128 पोलिंग बूथ बनविण्यात आले होते. गोवा नंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात ही दोन राज्ये अशी आहेत. ज्यात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला गेला.