Gujarat Election Result Live Updates : गुजरातच्या 182 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलीय.. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर 2022 अशा दोन टप्प्यांत निवडणूक झाली. एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्वांनीच भाजपला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवलाय... मात्र आज प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल, तेव्हा तोच कौल राहणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय...


मतमोजणी केंद्र सज्ज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज गुजरातसाठी हायव्होलटेज दिवस आहे. तुम्हाला माहिती आहे का मतमोजणीसाठी काम करणारे अधिकारी असतात तरी कोण? कोणाला आज सर्वप्रथम कळणार निवडणुकांचे निकाल, ही माणसं साधीसुधी नाहीत.  अहमदाबादमध्ये 3, सुरतमध्ये 2 आणि आनंदमध्ये 2 मतमोजणी केंद्रे आहेत. सर्व जिल्ह्यातील प्रत्येक मतमोजणी केंद्रावर एकाच वेळी मतमोजणी सुरु करण्यात येते. 


 'यांना' सर्वप्रथम कळणार निवडणुकांचे निकाल


मतमोजणी केंद्रावर यांच्यावर अधिक भार


182 मतमोजणी निरीक्षक
182 निवडणूक अधिकारी
494 सहायक निवडणूक अधिकारी 


मतमोजणीसाठी हेही असतील


अतिरिक्त 78 सहायक निवडणूक अधिकारी
71 अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी



या मतमोजणीची पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक आणि मतमोजणी सहाय्यक यांची कर्तव्ये नियुक्त केली आहेत. याशिवाय मतमोजणी सभागृहात दोन सूक्ष्म निरीक्षक ठेवण्यात येणार आहेत. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे.