सासूचा पत्ता कट, सुनेला मिळाले तिकीट; घरात सुरू झाला राजकीय ड्रामा
गुजरातमधील विधानसभा निवडणूकीतही काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यात पक्षाने सासूचा पत्ता कट करत सुनेला तिकीट दिले आहे. त्यामुळे सासूने सुनेला धमकी दिली आहे.
वडोदरा : दारातलं राजकाणर घरात आलं की चांगल्या चाललेल्या नात्याचा खेळ खंडबा झालाच म्हणून समजा. गुजरातमधील विधानसभा निवडणूकीतही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यात पक्षाने सासूचा पत्ता कट करत सुनेला तिकीट दिले आहे. त्यामुळे सासूने सुनेला धमकी दिली आहे.
प्रचाराला घराबाहे कशी पडते तेच पाहते...
घटना आहे गुजरातमधील कलोल मतदार संघातील. इथे भारतीय जनता पक्षाने तिकीट वाटप करताना पक्षाचे खासदार प्रभात सिंह चौहान यांच्या सुनेला (सुमन चौहान) तिकीट दिले. त्यामुळे सुमन यांची सांसू रंगेश्वरी भलत्याच नाराज झाल्या आहेत. या नाराजीचे पर्यावसन रागात झाले असून, रागाच्या भरात त्यांनी आपल्या सुनेलाच धमकी दिली आहे की, प्रचारासाठी घराबाहेर पडायचे नाही.
कोण आहे सासूचा पत्ता कट करणारी सुन ?
दरम्यान, खासदार प्रभात सिंह यांनी आपली पत्नी रंगेश्वरी यांच्यासाठी पक्षाकडे तिकीट मागितले होते. त्यासाठी त्यांनी राज्यातील पक्षनेत्यांकडे संपर्कही केला होता. मात्र, पक्षाने उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर केली तेव्हा रंगेश्वरी यांचा पत्ता धक्कादायकरित्या कट झाला होता. रंगेश्वरी यांच्याऐजी खासदार प्रभात सिंह यांच्या सुनबाई सुमन चौहान यांना तिकीट मिळाले आहे. सुमन चौहान या प्रभात सिंह यांच्या पहिल्या पत्निपासून झालेले पूत्र प्रवीण सिंह यांच्या यांच्या पत्नी आहेत.
रंगेश्वरी यांचे म्हणने काय?
दरम्यान, घडलेल्या एकूण प्रकरणाबाबत बोलताना रंगेश्वरी यांनी म्हटले आहे की, 'मी प्रभात सिंह यांची पत्नी असल्याचा दावा करत नाही. पण, मी बऱ्याच काळापासून या मतदारसंघात काम करते आहे. त्यामुळे योग्य आणि प्रामाणीक कष्ट करणाऱ्या व्यक्तीस तिकीट मिळणे अपेक्षी होते. तसे घडले असते तर अधिक आनंद झाला असता. प्रविण सिंह हा गटबदलू आहे. आणि प्रभात सिंह हे जर खरे असतील तर त्यांनी सुनेच्या प्रचारासाठी बाहेर निघून दाखवावे.'