बडोदा : निवडणुका म्हटलं की जाहीरनामे आलेच. सर्वच राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. मतदारांना नेमकं काय हवंय हे ओळखून पक्षांचा जाहीरनामा भरलेला असतो. मतदारांच्या अपेक्षा कितपत पूर्ण होतात हा अभ्यासाचा विषय असला तरी निवडणुकीआधी जाहीरनामा हा चर्चेचा विषय असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमध्ये बडोद्यात स्थानिक निवडणुकासाठी तयार केलेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याची सध्या जोरदार चर्चा आहे. बडोद्यातील काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत पटेल यांच्या जाहीरनाम्यात तरुणाईसाठी अजब आश्वासन दिलंय.



काँग्रेस सत्तेत आल्यास तरुण-तरुणांसाठी, विद्यार्थी, कपल आणि कॉर्पोरेटसाठी डेटिंगसाठी कॉफी शॉप सुरु करण्याचं आश्वासन दिलय. 


तसचं महिलांसाठी खास किटी पार्टी हॉल तयार करण्याचे आश्वासन दिलय. आणि वेशेष म्हणजे बडोदा काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांसाठी डेटिंगसाठी खास जागेची व्यवस्था करुन देईल असं अजब आश्वासन दिलय.