Paresh Rawal Apologises: गुजरात निवडणुकीचा (Gujrat Election) पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अशातच परेश रावल यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय. ज्यामध्ये रावल यांनी रोहिंग्या मुस्लिमांचा (Rohingya Muslim) उल्लेख करताना एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून नवा वाद निर्माण झालाय. त्यानंतर परेश रावल यांनी माफी देखील मागितली आहे. (gujrat election paresh rawal apologises for his remark will you cook fish for bengalis on cheap gas cylinders)


काय म्हणाले होते Paresh Rawal ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गॅस सिलिंडर (Gas Cylinders) महाग आहेत, पण काळजी करू नका ते स्वस्त होतील. लोकांना रोजगार देखील मिळेल, पण रोहिंग्या मुस्लिम आणि बांग्लादेशी तुमच्या आजूबाजूला राहू लागतील तेव्हा काय होईल? हे दिल्लीत घडतंय. मग तेव्हा तुम्ही गॅस सिलिंडरचे काय करणार? बंगाली लोक मासे (Bangali) कसे शिजवणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे मोठा वाद होताना दिसतोय.


 कीर्ती आझाद यांचा खडा सवाल - 


परेश रावल यांच्या व्हिडीओ व्हायरल (Paresh Rawal Viral Video) झाल्यानंतर अनेकांनी परेश रावल यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद (Kirti Azad) यांनी परेश रावल यांच्यावर निशाणा साधला. बाबूभाई तुम्ही तर असे नव्हता. जर बांगलादेशी आणि रोहिंग्या भारतात घुसत आहेत, तर याचा अर्थ गृहमंत्री काम चोखपणे करू शकत नाहीत, असं आझाद म्हणाले.



आणखी वाचा - Chandrakant Patil: "राज्यपालांकडून चुकलं असेल तर..." अन् भर पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांनी जोडले हात!


परेश रावल यांनी मागितली माफी -



दरम्यान, अर्थात मासे हा मुद्दा नाही, कारण गुजराती मासे शिजवतात आणि खातात. पण मला बंगाली भाषेत स्पष्ट करू द्या... माझा अर्थ बेकायदेशीर बांग्लादेशी म्हणजे रोहिंग्या. पण तरीही माझ्याकडून तुमच्या भावना आणि भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो, असं परेश रावल (Paresh Rawal Apologises) म्हणाले आहेत.