गुजरात : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या गुजरात दौ-यावर असून या दौ-याच्या तिस-या दिवशी घेतलेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते म्हणाले की, ‘आजकाल गुजरातमधील सरकार रिमोट कंट्रोलने चालतं’. आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे गुजरात दौ-यावर गेले आहेत. 


ANI ने दिलेल्या वॄत्तानुसार राहुल गांधी म्हणाले की, ‘आजकाल गुजरातमध्ये सरकार रिमोट कंट्रोलने दिल्लीवरून चालतं. आम्हाला गुजरातमध्ये कॉंग्रेसचं सरकार आणायचं आहे. जे इथूनच चालवलं जाईल’. यावेळी भाषणाची सुरूवात करण्याआधी राहुल गांधी यांनी नागरिकांना त्यांची ख्यालीखुशाली जाणून घेण्यासाठी ‘केम छो’ असे विचारले. तेव्हा जनतेकडून लगेच प्रतिसाद मिळाला की, ‘गाडो भई छो’. ‘गाडो थई छो’ चा अर्थ गुजरातीमध्ये पागल झालो. वेडे झालो असा होतो. महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ‘विकास गाडो थई छो’ असा नारा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अमेरिका दौ-यावरून परत आल्यानंतर राहुल गांधी आगामी गुजरात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इथे प्रचारात बिझी आहेत. 


‘भाजपला मत देऊन लोकांना पश्चाताप’


सोमवारी राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये जीएसटी, नोटाबंदी आणि कृषी धोरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तसेच राहुल गांधी आगामी विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसला विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय. पहिल्या दिवशी जामनगरमध्ये झालेल्या रोड शोनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल म्हणाले की, भाजपला मत देऊन लोक पश्चाताप व्यक्त करत आहेत.