Jio Sim Card : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा आदेश काढण्यात आला आहे.  राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांची वोडाफोन-आयडिया सर्व्हिस (Vodafone-Idea) सोमवारपासून बंद करण्यात आली आहे. तसंच कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर रिलायन्स जिओ (Reliance Jio) वर ट्रान्सफर करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश
गुजरात सरकारने (Gujrat Government) आपल्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हे आदेश दिले आहेत.  गुजरातमध्ये बहुतांश कर्मचाऱ्यांची सरकारी कामं वोडाफोन-आयडीचं सीम कार्डवर होत होती. अनेक कर्मचारी वोडाफोन-आयडीया मोबाईल नंबरचा वापरत होते. पण सोमवारी 8 मे रोजी गुजरात सरकारने एक आदेश जारी केला. यात तात्काळ Vodafone-Idea ज्या जागी Reliance Jio नंबरचा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रिलायन्स जिओने विशेष प्लान दिला आहे. या प्लान अंतर्गत कर्मचाऱ्यांना महिन्याला केवळ 37.50 रुपये आकारले जाणार आहे. 


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्लान
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देण्यता आलेल्या प्लानमध्ये कोणत्याही मोबाईल ऑपरेटर, लँडलाईनवर फ्री कॉलिंग करता येणार आहे. याशिवाय वापरकर्त्याला दर महिन्याला 3 हजार मोफत SMS मिळणार आहेत. मोफत एसएमएसची सेवा संपल्यास तीन हजारच्या पुढच्या प्रत्येक एसएमएसला पन्नास पैसे शुल्क भरावं लागणार आहे. तर आंतरराष्ट्रीय एसएमएस करण्यासाठी 1.25 रुपये मोजावे लागणार आहेत. 


जिओ प्लानची इंटरनेट सुविधा
Reliance Jio बरोबर झालेल्या करारानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना या प्लान अंतर्गत महिन्याला 4G चा 30 GB डेटा दिला जाणार आहे. हा डेटा संपल्यानंतर डेटा वाढवण्यासाठी प्लानमध्ये 25 रुपये मोजावे लागणार आहेत. हे अतिरिक्त शुल्क भरल्यास 60 GB डेटा वापरकर्त्याला मिळणार आहे. 4G चा अनलिमिटेड प्लान घेतल्यास प्रत्येक महिन्याला 125 रुपये अतिरिक्त भरावे लागतील. इतकंच नाही तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 4G च्या पैशातच 5Gचा प्लान मिळणार आहे. 


गुजरात सरकारचा अचानक निर्णय
गुजरात सरकारमधील सर्व कर्मचारी आतापर्यंत वोडाफोन-आयडिया पोस्टपेड सर्व्हिस वापरत होते. ही सेवा बदलून आता अचानक रिलायन्स जिओची सेवा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी कर्मचारी आता जो  वोडाफोन-आयडिया पोस्टपेड नंबर वापरत आहेत, तो नंबर मोबाईल पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून जिओमध्ये ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आला आहे. म्हणजे मोबाईल नंबर बदलला जाणार नाही तर केवळ मोबाईलची सेवा बदलली जाणार आहे.