मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपच्या नव्या आमदारांची आज बैठक
गुजरातचा नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी आज गांधीनगरमध्ये भाजपच्या नव्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला दिल्लीहून पर्यावेक्षक म्हणून अर्थमत्री अरुण जेटली, ज्येष्ठ भाजप नेत्या सरोज पांडे, आणि भूपेंद्र यादव उपस्थित राहणार आहेत.
अहमदाबाद : गुजरातचा नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी आज गांधीनगरमध्ये भाजपच्या नव्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला दिल्लीहून पर्यावेक्षक म्हणून अर्थमत्री अरुण जेटली, ज्येष्ठ भाजप नेत्या सरोज पांडे, आणि भूपेंद्र यादव उपस्थित राहणार आहेत.
यावेळी आमदार नव्या नेत्याच्या नावावर चर्चा करतील. पर्यावेक्षक आमदारांची मत संसदीय बोर्डाला कळवतील. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्याचं नाव घोषित करण्यात येईल. मावळते उपमुख्यमंत्री नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत.
पण निवडणूक विजय रुपाणींच्या नेतृत्वात लढण्यात आली. त्यामुळे नेमकं कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबरला गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यताय.