जयपूर : राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेला राजकीय पेच अजूनही सूटलेला नाही. उत्तर भारतातील तीन राज्यांमधील गुर्जर समुदाय हा सचिन पायलट यांच्या समर्थणात उतरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तीन राज्यांतील गुर्जर समाजातील लोकं गुरुग्राममध्ये एकत्र येण्याची तयारी करत आहेत. गुर्जर समाज 26 जुलै रोजी येथे महापंचायत घेणार असून त्यात तीन राज्यांचे प्रतिनिधी सहभागी होतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुग्रामच्या रीठौज गावात 26 जुलै रोजी ही महापंचायत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील गुर्जर समाज सचिन पायलट यांच्या समर्थनात उतरणार आहे. सचिन पायलट यांचे गुर्जर समाजात खूपच वर्चस्व आहे. त्यांचे वडील राजेश पायलटही एक उत्तम गुर्जर नेते होते. अशा परिस्थितीत जेव्हा सचिन पायलट राजस्थानमध्ये बाजूला केले जात आहेत, तेव्हा हा समाज गेहलोत याच्या विरोधात एकत्र येण्याची तयारी करत आहे.


गुर्जर समाजाने अशोक गहलोत यांच्याविरोधात महापंचायत जाहीर केली आहे पण कोरोना संकटाच्या वेळी त्याचे आयोजन कसे केले जाईल यावर प्रश्नचिन्ह आहे. कोरोना संकटाच्या वेळी एकत्र न येण्याचा नियम अजूनही लागू आहे. अशा प्रकारे या पंचायतीला परवानगी कशी आहे आणि किती लोक यात सामील आहेत. यावर देखील सगळ्यांच लक्ष आहे.


जेव्हा 2018 मध्ये अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले, तेव्हा सचिन पायलट समर्थकांनी राज्याच्या विविध भागात निषेध केला होता. गुर्जर समुदाय हा सचिन पायलट यांच्यासाठी ट्रम्पकार्ड असू शकतो. सध्या पायलट आणि गेहलोत सभागृहापासून कोर्टपर्यंत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.