बलात्कारी गुरमीत राम रहीमला २० वर्षाची शिक्षा
डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दोन साध्वींवर बलात्कार प्रकरणात १० - १० अशा २० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अगोदर डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहीमला १० वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र कोर्टाने आता ती २० वर्षाची केली आहे.
चंदीगड : डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दोन साध्वींवर बलात्कार प्रकरणात १० - १० अशा २० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अगोदर डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहीमला १० वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र कोर्टाने आता ती २० वर्षाची केली आहे.
शिक्षेची सुनावणी होत असताना राम रहिम न्यायालयामध्ये रडला. आणि आपण चांगलं काम केल्यामुळे मला शिक्षेत सूट मिळावी अशी मागणी त्यानं न्यायालयात केली. राम रहिम हा सीबीआयचा कैदी नंबर १९९७ असणार आहे. इतर कैद्यांप्रमाणेच बाबा राम रहिमला जेलमध्ये काम करावं लागणार आहे.
सीबीआयचे प्रवक्ता अभिषेक दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरमीत राम रहीमला २० वर्षाची शिक्षा न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेश मोडणाऱ्या राम रहीमच्या पाच अनुयायांना अटक करण्यात आली. रामरहीमचे काही अनुयायी शनिवारी रात्री उत्तम धर्मशाला येथे जमले होते. तेथे त्यांनी एक बैठक घेतली. यानंतर सरकारविरोधी घोषणा देत ते पाराव चौकाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली.दोन अनुयायी साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी सीबीआयच्या न्यायालयाने राम रहीमला दोषी ठरविले होते. या निकालानंतर राम रहीमच्या अनुयायांनी ठिकठिकाणी हिंसक कारवाया केल्या. या हिंसाचारातील मृतांचा आकडा ३८ वर पोहोचला आहे. या निकालानंतर अफवा पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पंजाब व हरियाणामधील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली