बंगळुरु : कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यात बी. एस. येडियुरप्पा अपयशी ठरल्याने त्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली. तरीही भाजपने राजकीय मैदानातून माघार घेतली नसल्याचे दिसत आहे. एकीकडे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमताच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. तर दुसरीकडे भाजप अखेरचा डाव खेळलाय. भाजपने विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा केलाय. हा डाव टाकून नव्या सरकारला भापने कोंडीत पकडले आहे. बहुमत चाचणीआधी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे काँग्रेस-जेडीएस सरकारला दुहेरी अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुमत चाचणीआधी कर्नाटक विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. काँग्रेस-जेडीएस आघाडीनं विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आरोग्य मंत्री के. आर. रमेश यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपनं माजी कायदा मंत्री एस. सुरेश कुमार यांना मैदानात उतरवून कुमारस्वामी सरकारची डोकेदुखी वाढवलेय. त्यामुळे आता जेडीएस-काँग्रेस आघाडीसाठी बहुमताची परीक्षा सोपी झाली असली तरी, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.


संख्याबळाचा विचार करता आघाडी बाजी मारेल. मात्र, भाजप पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्याच्या तयारीत दिसत आहे. त्यामुळे सभापती निवडणुकीत उडी घेतलेय. या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे, अशी खात्री भाजप नेत्यांना आहे. त्याच विश्वासावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असे भाजपचे उमेदवार एस. सुरेश कुमार म्हणाले. दरम्यान, बहुमत चाचणीआधी खबरदारी म्हणून काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या आमदारांना व्हिप बजावलाय. तसेच योग्य ती खबरदारी म्हणून पुन्हा हॉटेलांत पाठवलं आहे. आमदारांना त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कही करण्यास मनाई करण्यात आलेय. त्यांचे मोबाइलही काढून घेतले आहेत.  


कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना विधानसभेत आज बहुमताचा सामना करावा लागेल. कर्नाटक विधानसभेत आज मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी हे बहुमत सिद्ध करणार आहेत. दुपारी १२.१५ वाजता पहिल्यांदा विधानसभा सभापती निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा सभापती निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी रंगणार आहे. त्यानंतर कुमारस्वामी आपले बहुमत सिद्ध करणार आहेत. तथापि, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केलाय.  


दरम्यान विश्वासदर्शक ठरावा आधी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी प्रश्न विचारला गेला. तुम्हाला काही टेन्शन आहे का? आमच्यावर कोणतेही टेन्शन नाही तसेच कोणताही तणाव नाही, आम्ही बहुमतानेच विश्वासदर्शक ठराव जिंकू असा विश्वास कुमारस्वामी यांनी यावेळी व्यक्त केलाय. कुमारस्वामी यांना एएनआयने  वृत्तसंस्थेने एक प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणालेत "माझ्यासमोर काही तणाव नाही. बहुमत मिळवून मी विश्वासदर्शक ठराव जिंकणार आहे.'


कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून जनता दल सेक्युलरचे एच. डी. कुमारस्वामी यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि दलित नेते जी. परमेश्वर यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कर्नाटक विधानसभेच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यात राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. कर्नाटकातला गेल्या आठवड्याभरातला हा दुसरा शपथविधी सोहळा होता. त्याआधी भाजपचे नेते बी.एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यांनी बहुमताची परीक्षा देण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.