नवी दिल्ली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळंच अलबेल आहे असं नाही. तिन्ही पक्ष आपले संघटन वाढवण्यासाठी एकमेकांवर कुरघोड्या करीत असल्याचे दिसून आले आहे. नुकतेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस स्वबळावर निवडणूका लढवणार तशा सूचना कार्यकर्त्यांना करण्यात आल्याचे म्हटले होते. त्यावर कॉग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. ही चर्चा राज्यातील कॉंग्रेसचे संघटन मजबूत करण्यासंदर्भातील असणार आहे. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करीत असून ते 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करणार आहे. तिन्ही पक्षांत कोणतेही मतभेद नाहीत, असे एच के पाटील यांनी म्हटले आहे.


इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस चालणार नाही. महाविकास आघाडी सरकार धोक्यात नसून ते मजबूत आहे. आम्ही किमान समान कार्यक्रमावर काम करतोय. असेही पाटील यावेळी म्हणाले.


नाना पटोले यांनी निवडणूका स्वबळावर लढवण्याच्या वक्तव्यावर एच के पाटील यांनी फारसा उत्साही प्रतिसाद दिला नाही. ' आता कोणत्याही निवडणूका नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीवेळी ते पाहता येईल. हा निर्णय पक्षश्रेष्टी घेतील.' असे त्यांनी म्हटले.