मुंबई : हेअर ड्रायर (hair dryer) वापरण आजकाल सामान्य झालंय. सलून, स्पामध्ये दिसणारा हा हेअर ड्रायर आजकाल घराघरात तरूणी वापरताना दिसतात. अशाच तरूणींसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. कारण या घटनेत हेअर ड्रायर वापरताना जे घडलंय. ते पाहून तुम्ही हेअर ड्रायर वापरण विसरणार आहात. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. नेमकं या घटनेत काय घडलंय ते जाणून घेऊयात.  
 
हेअर ड्रायर (hair dryer) दररोज अनेकांच्या घरी आणि सलूनमध्ये वापरले जातात. केस सुकवण्यासाठी लोक याचा वापर करतात, पण या हेअर ड्रायरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाने आता हेअर ड्रायर वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओत काय?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक हेअर ड्रायर जीवघेणा ठरताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, केस योग्य आकारात आणण्यासाठी न्हावी ग्राहकावर हेअर ड्रायर (hair dryer) वापरतो. परंतु त्याच वेळी त्याचा स्फोट होतो आणि आगीचा भडका उडतो. त्यानंतर फक्त आग आणि धूरच दिसतो.



न्हावी प्रथम हेअर ड्रायरला (hair dryer) इलेक्ट्रिकल बोर्डशी जोडतो आणि तो सुरू करताच त्याचा स्फोट होतो. चेअरवर बसलेल्या ग्राहकाच्या केसाला देखील आग लागते. आणि संपुर्ण दुकानात एकच धूर पसरतो. भीषण आगीमुळे काही सेकंदात सर्वकाही नष्ट होते. स्फोटानंतर काही लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत आहे.हा धक्कादायक व्हिडिओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.