हाजीपूर : बिहारच्या हाजीपूरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भोंदू साधूंचं पितळ उघडं पाडलंय. 6 मुस्लीम युवक साधूच्या वेशात नंदीला फिरवून भीक मागत होते असा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमधील हाजीपूरमध्ये बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी 6 भोंदू साधूंचा भांडाफोड केला. हे 6 जण साधू नव्हते तरीही साधूंचा वेश परिधान करून नंदीला फिरवून भीक मागत होते.  सगळ्यांची नावं विचारताच खोटी नावं सांगितल्याने त्यांना पोलिसांच्या हवाली केलंय.


स्थानिकांनी दावा केला की, हे सगळे जण बांग्लादेशातील रोहंग्या मुस्लीम आहेत. भीक मागणा-या 6 भोंदू साधूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी सुरूये.तर नंदीला गोशाळेत ठेवण्यात आलंय.