ज्ञानवापीत शिवलिंगच नाही तर... !
ज्ञानवापीच्या आवारातील एक फोटो झी मीडियाला सापडला आहे. हा फोटो 154 वर्ष जुना आहे. हा ऐतिहासिक फोटो महत्त्वाचा दस्ताऐवज ठरु शकतो
वाराणसी: ज्ञानवापी मशिद प्रकरणी (Gyanvapi) झी मीडियाची एक्सक्लुझिव्ह रिपोर्टिंग सुरु आहे. देशभरातील वृत्तपत्राची हेडिंग ठरलेल्या ज्ञानवापी प्रकरणात एक नवा दस्ताऐवज समोर आला आहे. ज्ञानवापीच्या आवारातील एक फोटो झी मीडियाला सापडला आहे. हा फोटो 154 वर्ष जुना आहे. हा ऐतिहासिक फोटो महत्त्वाचा दस्ताऐवज ठरु शकतो.
ज्ञानवापीमध्ये हनुमानाची मूर्ती
ज्ञानवापीमधला 154 वर्ष जुना फोटो समोर आला आहे. हा फोटो ब्रिटीश फोटोग्राफर सॅम्युअल बॉर्न (Samuel Bourne) यांनी काढलेला आहे. या फोटोमध्ये महादेवाचे 11 अवतार बजरंग बली म्हणजेच हनुमानाची मूर्ती (Lord Hanuman) दिसत आहे. तसंच या फोटोत भगवान शंकराचे वाहन नंदी (nandi) विराजमान असल्याचं दिसतंय. मंदिरात असणारी घंटा स्पष्ट या फोटोमध्ये दिसत आहे. हा फोटो बारकाईने पाहिल्यास असं दिसून येईल की, फोटोतील बांधकाम पूर्णपणे हिंदुशिल्पाकृतीचा उत्तम नमुना आहे.
कुठून मिळाले हे ऐतिहासिक प्रमाण?
हिंदू पक्षाच्या म्हणण्यानुसार विवादित जागी श्रृंगार गौरी देवीचं स्थान आहे. तसे पुरावे समोर मांडत पुजा करण्याची परवानगी मागितली होती. प्रकरण सध्या कोर्टात आहे.
याच दरम्यान झी मीडियाच्या हाती लागलेल्या या फोटो हिंदू पक्षाचा दावा अधिक बळकट करु शकतो. समोर आलेला फोटो अमेरिकेच्या ह्युस्टन स्थित 'द म्यूजियम ऑफ फाइन आर्ट्स' (The Museum of Fine Art) मध्ये आहे